Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 272 मतदान केंद्र

तब्बल 2 लाख 88 हजार 411 मतदारांचा समावेश

कोपरगाव शहर : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर केली असून यात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी

Ahmednagar Sex Racket Exposed : हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा (Video)
शिर्डी येथील पाळणा अपघातातील साळवे कुटुंबास 50 हजारांची मदत
कोळपेवाडीत साकारणार अद्यावत कॉम्पलेक्स व बसस्थानक

कोपरगाव शहर : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर केली असून यात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया होऊन शनिवार 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न होईल तरी या निवडणूक प्रक्रिया करीता मंगळवार 15 ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या निवडणूक प्रक्रियेत संपूर्ण राज्यात बहुचर्चित असा सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील सहकारातील मातब्बर घराणे म्हणून संपूर्ण राज्यात एक वेगळीच ओळख असलेल्या 219- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात 272 मतदान केंद्र असून यात 1 लाख 45 हजार 834 पुरुष मतदार तर 1 लाख 42 हजार 571 स्त्री व तृतीयपंथीय 6 असे एकूण 2 लाख 88 हजार 411 मतदारासून यात 18 ते 19 वयोगटातील 7 हजार 963 मतदार, 20 ते 29 वयोगटातील 65 हजार 775 मतदार, 30 ते 39 वयोगटातील 60 हजार 468 मतदार, 40 ते 49 वयोगटातील 58 हजार 767 मतदार, 50 ते 59 वयोगटातील 44 हजार 608 मतदार, 60 ते 69 वयोगटातील 28 हजार 748 मतदार, 70 ते 79 वयोगटातील 14 हजार 830 मतदार, 80 ते 89 वयोगटातील 5 हजार 941 मतदार, 90 ते 99 वयोगटातील 1 हजार 192 मतदार, 100 ते 109 वयोगटातील 118 मतदार तर 120 पेक्षा अधिक वय असलेला 1 मतदार असे एकूण 2 लाख 88 हजार 411 मतदार कोपरगाव विधानसभा मतदार संघात आहे. कोपरगाव 219 विधानसभा मतदान केंद्रासाठी नामनिर्देशन पत्र कोपरगाव येथील तहसील कार्यालयातील सुनावणी कक्षात स्वीकारले जाणार आहे तर मतमोजणी शहरातील सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या तळमजल्यामध्ये होणार आहे तर या निवडणूक प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 10 हजार रुपये तसेच अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 हजार रुपये इतकी अनामत रक्कम असणार आहे. तर उमेदवारांना निवडणुकीसाठी 40 लाख रुपये इतकी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने ठरवून दिली आहे. तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाकरिता अहिल्यानगर येथील भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत, कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप व कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी संतोष राऊत हे असणार आहे. त्यासोबतच कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह सर्व विभाग मिळून तब्बल 2 हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रिया संपन्न करण्यासाठी कार्यरत असणार आहे.

COMMENTS