Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचे होणार भारताकडे प्रत्यार्पण

नवी दिल्ली : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचे अमेरिका लवकरच भारताकडे प्रत्यार्पण करणार आहे. व्हाईट हाऊसमधील द्विपक्षीय बैठकीन

LokNews24 l देशाच्या लोकशाहीवर प्रधानमंत्री मोदींचा घाला ; मोदींचे फंडे आणि जूमले फक्त निवडणुकीपुरते
काँग्रेस सांस्कृतिक विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांची निवड
आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण

नवी दिल्ली : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचे अमेरिका लवकरच भारताकडे प्रत्यार्पण करणार आहे. व्हाईट हाऊसमधील द्विपक्षीय बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 26/11 हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याला भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिली होती. तहव्वूर हा मूळ पाकिस्तानचा असून तो कॅनडाचा नागरिक आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करतांना ट्रम्प म्हणाले की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आमच्या प्रशासनाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जगातील अत्यंत वाईट व्यक्तींपैकी एक असलेल्या तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. तो आता न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्यासाठी भारतात परत जाईल, असे ट्रम्प म्हणाले. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि सध्या लॉस एंजेलिसमधील तुरुंगात असलेल्या राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने सातत्याने प्रयत्न केले. तो पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी जवळचा संबंध आहे. ज्याला ’दाऊद गिलानी’ म्हणूनही ओळखले जाते. तो दहशतवादी हल्ल्यांमधील एक प्रमुख सूत्रधार आहे. त्याच्यावर हेडली तसेच लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि पाकिस्तानमधील इतर दहशतवादी गटांना हल्ला घडवून आणण्यास मदत केल्याचा आरोप आहे. जगभरातील कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी धोक्याचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका यापूर्वी कधीही न पाहिलेल्या पद्धतीने एकत्रितपणे काम करतील, असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

तहव्वूर राणावर प्रमुख आरोप काय ?
तहव्वूर राणा याने मुंबईवरील हल्ल्यापूर्वी येथील संभाव्य लक्ष्यांची रेकी करण्याची जबाबदारी डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद सैयद गिलानीवर सोपवण्यात आली होती. कोणाला संशय येऊ नये त्यासाठी डेव्हिड हेडलीचा मुंबई दौरा व्यावसायिक कामासाठी दाखवण्यात आला होता. त्यात राणाचा मोठा सहभाग आहे. राणाचा ‘इमिग्रेशन’ व्यवसाय होता. त्याचाच आधार घेऊन त्याच्या कंपनीची एक शाखा मुंबईतील ताडदेव परिसरात सुरू होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. त्यासाठी मुंबईत एक इमिग्रेशन सेंटर उभे करण्यात आले. त्याच्याच कामासाठी हेडली मुंबईत यायचा. यावेळी त्याने अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा आरोप आहे.

COMMENTS