Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यात 25 वा कारगिल विजय दिवस उत्साहात

राहाता ः तालुका माजी सैनिक संघटना व राहाता ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनिलकुमार निकाळे चौक येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

म्हैसगाव येथील खासगी सावकार गजाआड
रामशिंग बाबांचा जंगी यात्रा उत्सवाचे उद्या आयोजन
यंदाच्या गणेशोत्सवावर…राष्ट्रवादीचा वरचष्मा ?

राहाता ः तालुका माजी सैनिक संघटना व राहाता ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनिलकुमार निकाळे चौक येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी तहसिलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील,  मुख्याधिकारी वैभव लोंढे, राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ साहेब, माजी सैनिक  संघटना अध्यक्ष फ्रान्सिस भारुड, तसेच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व राहाता ग्रामस्थ , हुतात्मा अनिलकुमार निकाळे यांचे बंधू राजेंद्र निकाळे या कार्यक्रमाला हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देशमुख यांनी करताना सांगितले की हा 25 वा कारगिल विजय दिवस भारतभर साजरा होत असून यामुळे देशप्रेम, कर्तव्यनिष्ठ, सामाजिक आदर्श  समाजात वाढीस लागले. कारगिल विजय दिवस हा कारगिल युध्दात शहीद झालेल्या युध्दवीरांना स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच देशातील नागरिक व तरुणांमध्ये देशप्रेम व कर्तव्याची भावना वाढीस लागावी यासाठी साजरा केला जातो.याप्रसंगी मेजर संजय राजगुरू, भानुदास गाडेकर यांनी मनोगत व्यक्त करुन ते स्वतः कारगिल युध्दात सहभागी होते हे सांगितले. याप्रसंगी माजी सैनिक चंद्रभान कोरडे, तलाठी कोळगे, अरुण टिळेकर, तात्यासाहेब कोरडे, संजय राजगुरू, अशोक राजगुरू, गिते, वसंत सदाफळ, अविनाश निर्मळ, वसंत डांगे, दगडूपंत काटे, विष्णू गायकवाड, महेश हिरवे, कॅप्टन गायकवाड तसेच ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते अनिल सोमवंशी, विष्णुपंत सदाफळ, रवी बोठे, विजय आवारे, बाळासाहेब गुळवे, डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे,उपस्थित होते.

COMMENTS