Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातील 56 केंद्रांवर 25673 विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ची परीक्षा

लातूर प्रतिनिधी - वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट’ची परीक्षा रविवार दि. 7 मे रोजी लातूर जिल्ह्यातील 56 केंद्रांवर झाली. 25 हजार 807 विद

अहमदपुरात 11 जुगार अड्ड्यांवर एकाच वेळी छापा
फुकट्या प्रवाशांकडून 11 लाखाचा दंड वसूल
बारामतीमध्ये धनगर समाजाचे आंदोलन

लातूर प्रतिनिधी – वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट’ची परीक्षा रविवार दि. 7 मे रोजी लातूर जिल्ह्यातील 56 केंद्रांवर झाली. 25 हजार 807 विद्यार्थ्यांपैकी 25 हजार 673 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 56 केंद्रांवर शांततेत ही परीक्षा पार पडली. परीक्षेदरम्यान एकाही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही.
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणा-या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा अत्यंत महत्वपूर्ण असते. विद्यार्थ्यांच्या जीवनातील ही परीक्षा एक महत्वाचा टप्पा असतो. यंदा ही परीक्षा रविवार दि. 7 मे रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत झाली. मागील दोन वर्षांपासून तयारी करणारे विद्यार्थी रविवारी नीटच्या परीक्षेला सामोरे गेले. सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात आला. दुपारी 1.30 वाजता परीक्षा केंद्रांवरील प्रवेश बंद करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना 1 तास 5 मिनिटांचा अधिकचा वेळ देण्यात आला. सर्वच परीक्षा केंद्रांवर बायोमेट्रीक हजेरी होती. एनटीएच्या मार्गदर्शक सूचनेनूसार जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर तयार केली गेली होती. लातूर शहरासह यंदाही लातूर तालुक्यातील गंगापूर, आर्वी, बाभळगाव, पेठ, औसा तालुक्यातील हासेगाव, अलमला, उदगीर आणि अहमदपूर या ग्रामीण भागातही परीक्षा केंद्र होती. नीटची परीक्षा सुरळीतपणे पार पडावी, यासाठी तीन समन्वयक नेमण्यात आले होते. 19, 19 आणि 18 असे 56 परीक्षा केंद्र या तीन समन्वयकांकडे देण्यात आलेले होते. लातूर शहरातील 13, उदगीरमधील 2, हासेगाव 1, अहमदपूर 1, कोळपा 1 व अलमला 1 अशा 19 केंद्रांसाठी 9 हजार 432 विद्यार्थी नीटच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 9 हजार 376 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 34 विद्यार्थी अनुपस्थित होते, असे नीट परीक्षेचे समन्वयक राज साखरे यांनी सांगीतले. 19 केंद्रांचे समन्वयक असलेले सच्चिदानंद जोशी यांनी सांगीतले की, त्यांच्याकडील 19 केंद्रांवर 6 हजार 703 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 6 हजार 671 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 32 विद्यार्थी अनुपस्थित होते. अन्य 18 केंद्रांवर 9 हजार 672 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 9 हजार 626 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 46 विद्यार्थी अनुपस्थित राहिल्याची माहिती समन्वयक राहूल आठवले यांनी दिली. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणा-या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची परीक्षा शांततामय वातावरणात निर्विघ्नपणे पार पडवी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून तयारी केलेली होती. एनटीएच्या मार्गदर्शक सूचनेनूसार जिल्ह्यातील 56 परीक्षा केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. परीक्षेदरम्यान अनुचित प्रकाश घडू नये, याची पुर्ण खबरदारी घेण्यात आलेली होती. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे व पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळाल्याचे परिक्षा समन्वयक राहूल आठवले यांनी सांगीतले. ‘नीट’च्या परीक्षेला 25 हजार 807 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 25 हजार 673 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 112 विद्यार्थी या परीक्षेस अनुपस्थित राहिले आहेत. जिल्ह्यातील 56 परीक्षा केंद्रांवर शांततेत परीक्षा पार पडली. परीक्षेदरम्यान एकही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती परीक्षा समन्वयकांनी दिली.

COMMENTS