अहमदाबाद : गुजरातमधील बोटाद जिल्ह्यमध्ये विषारी दारू पिल्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये अहमदाबादमधील चार लोकांच
अहमदाबाद : गुजरातमधील बोटाद जिल्ह्यमध्ये विषारी दारू पिल्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये अहमदाबादमधील चार लोकांचा सामावेश आहे. तसेच विषारी दारू पिल्यामुळे 30 पेक्षा अधिक लोकांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही रुग्णांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
बनावट दारू विक्रीप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर सोमवारी प्रशासनाने याची दखल घेतली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून गुजरातचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि अहमदाबाद गुन्हे शाखा (क्राईम ब्रांच) यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवलीत. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकार्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोताडला जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 30 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यापैकी बहुतांश जण भावनगर येथील सर तख्तसिंहजी रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दारुबंदी असतानाही दारुची विक्री
गुजरातमध्ये दारु बंदी असतानाही अवैध पद्धतीने दारू विकली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उपअधीक्षक अशोक यादव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. बनावट देशी दारूची निर्मिती करुन त्याची विक्री करणार्या तीन जणांना बोटाड जिल्ह्यातून अटक कऱण्यात आली असल्याची माहिती गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी दिली.
COMMENTS