Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हृदय विकाराच्या धक्क्याने 23 वर्षाच्या पैलवानाचा कोल्हापूरात मृत्यू

कोल्हापूर / प्रतिनिधी : आजकाल तरूणांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण खूप वाढले असून अनेक तरूणांना हृदय विकाराने आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोल्हापूर

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्यासह 308 श्‍वापदांची नोंद
विभुतवाडी येथील भीषण अपघातात सातार्‍यातील तिघांचा मृत्यू
माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू

कोल्हापूर / प्रतिनिधी : आजकाल तरूणांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण खूप वाढले असून अनेक तरूणांना हृदय विकाराने आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोल्हापूरमध्ये कुस्तीचा सराव करताना एका पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारूती सुरवसे असे मृत पैलवानाचे नाव आहे. तो अवघ्या 23 वर्षाचा होता. त्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.
मारूती सुरवसे हा पंढरपूर जवळील वाखरी येथील रहिवासी होता. अनेक वर्षापासून तो कोल्हापूरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. सोमवारी सायंकाळी सरावानंतर तो रूमला आला आणि अंघोळ केल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्या मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मारूती सुरवसे याचे वडील शेतकरी होते. त्याच्या मृत्यूने पंढरपूर तालुक्यात आणि कोल्हापूरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरोनानंतर तरूणांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढले असून अनेक तरूण हृदयविकाराने मृत्यूमुखी पडले आहेत.

COMMENTS