Homeताज्या बातम्या

नेर तलावात 22 टक्के पाणीसाठा; लोकप्रतिनिधींचे लक्ष्य मंत्री पदाकडे

पुसेगाव / वार्ताहर : जुलै महिना संपत आला, तरी खटाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. तालुक्याला वरदान ठरलेल्या नेर तलावात फक्त 22 टक्के

हिश्श्याच्या खुणा करण्यासाठी लाच घेणारी लिपिक कारागृहात
वेस शाळेच्या चिमुकल्यांनी जागविला देशभक्तीचा जागर
तुर्की भूकंपाने घेतले अनेक जीव

पुसेगाव / वार्ताहर : जुलै महिना संपत आला, तरी खटाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. तालुक्याला वरदान ठरलेल्या नेर तलावात फक्त 22 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण आहे. तलाव भरल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जिहे-कटापूरचे आवर्तन सुरू करून नेर तलाव भरावा, अशी लाभक्षेत्रातील शेतकरी मागणी करत आहेत. दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या पायउतारानंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये आपणास मंत्री पद मिळावे, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी फिल्डींग लावून बसलेले असल्याचे दिसून येत आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, खटाव तालुक्यात अजूनही दुष्काळी चित्र आहे. यंदा उन्हाळी पाऊसही अत्यल्प प्रमाणात झाला. मॉन्सूनने पाठ फिरवल्याने रिमझिम पावसाच्या ओलीवर खरीप पिकांच्या पेरण्या करून शेतकरी मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत. शेतात उगवून आलेल्या पिकांवर ऊन, ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. पाण्याअभावी खरिपासोबत रब्बीचा हंगाम अडचणीत येण्याची भीती आहे.
तलावात जिहे-कटापूर योजनेचे पाणी सोडल्यास शेतकर्‍यांना फायदा होईल. त्यातून सिंचन व पाणी टंचाईची समस्या दूर होईल. अल्प पाणीसाठा शिल्लक असताना नेर तलावात जिहे-कटापूरचे पाणी सोडण्यात येत नसल्याने शेतकर्‍यामध्ये नाराजी आहे. नेर तलावावर परिसरातील नऊ गावांच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास रब्बी हंगामातील 2636 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. नदीकडेला असणार्‍या विहिरींना सिंचन, पाणी पुरवठ्याच्या योजनांना लाभ होतो. त्यामुळे जिहे-कटापूर योजनेच्या पाण्याद्वारे नेर तलाव भरण्याची आवश्यकता आहे.
बहुचर्चित जिहे-कटापूर जलसिंचन योजनेच्या श्रेयवादाच्या लढाईचा राजकीय कलगीतुरा तालुक्यातील जनतेने अनुभवला आहे. सद्यःस्थितीत दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर येथील लोकप्रतिनिधींनी नेर तलावात जिहे-कटापूरचे आवर्तन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच राजकिय उलथा पालथीमध्ये मंत्री पद कोणाला मिळणार? याकडे सत्ताधारी गटातील लोकप्रतिनिधींचे लक्ष्य लागले असल्याचा आरोपही होवू लागले आहेत.

COMMENTS