छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे एका तरुणीने घरा

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे एका तरुणीने घरातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारसच्या सुमारास शहरातील हर्सूल सावंगी परिसरात घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. प्रिया रमेश बुजडे या तरुणीचे नाव आहे. ती शहरातील एका विद्यालयात फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. प्राप्त माहितीनुसार, गेल्या 20 दिवसांपासून प्रियाचे डोके दुखत होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले मात्र, डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे प्रियाने घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी प्रियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. आई-बाबा मला माफ करा मी चुकीचे करतेय, डोकेदुखी असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे. असं प्रियाने चिठ्ठीत नमुद केलं.
COMMENTS