Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

२०व्या ‘महाटेक २०२४’ या भव्य औद्योगिक प्रदर्शनाची ०८ फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात 

शमम इंजिनियरिंग इंडस्ट्रीज अँड सम्राट ऑटोमेशन नाशिकमधील या कंपन्यांचा सहभाग

नाशिक प्रतिनिधी - दि. ०८ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान  नवीन  कृषी  महाविद्यालय  पटांगण, सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळ

 कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र बर्डे
शरद पवारांचा पुन्हा यू टर्न
W.H.O च्या उत्तराने जगाचे टेन्शन वाढवले

नाशिक प्रतिनिधी – दि. ०८ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान  नवीन  कृषी  महाविद्यालय  पटांगण, सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या  वेळेत  आयोजित  करण्यात  आले  आहे.

• महाटेकचे हे २०वे वर्ष असून ह्या प्रदर्शनात भारता मधून ४०० पेक्षा जास्त उद्योजक सहभागी होणार असून जवळपास २०,००० हून अधिक ग्राहक भेट देणार आहेत.

• या प्रदर्शनात सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून, ऑनलाईन नोंदणी सेवा उपलब्ध आहे.

महाटेक २०२४ च्या भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री माननीय श्री. उदय सामंत, (महाराष्ट्र राज्य) आणि श्री. मनोज मीना, संस्थापक आणि सीईओ ॲटमबर्ग टेक्नॉलॉजीज यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता केले जाईल.

चौकट – 

महाटेकच्या या  चार दिवसीय औद्योगिक प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक उत्पादने, यंत्रे व उपकरणे विपणनासाठी आणि विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन मशीन टूल्स, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशनव ऑटोमेशन इक्विपमेंट्स, फार्मा आणि सपोर्टिंग इंडस्ट्रीज मधील कॉर्पोरेट्स, लघु व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध आहे.

या प्रदर्शनासाठी COSIA (चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन), TSSIA (ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन), GIA (गोवळीस इंडस्ट्रीज असोसिएशन), गोकुळ शिरगाव इंडस्ट्रीज असोसिएशन, असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, मध्यप्रदेश यांचे सहकार्य लाभले आहे.

महाटेकचे विशेष प्रायोजक :

• प्लॅटिनम प्रायोजक   :   रौनक स्वीचगिअर & ऑटोमेशन

• गोल्ड प्रायोजक   : अल्फालॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड

• सिल्व्हर प्रायोजक  :  एस.इ.डब्ल्यू (SEW) सरफेस कोटिंग्स प्रा. लि. 

• सिल्व्हर प्रायोजक  :  टॅक्स मंत्री

हे प्रदर्शन,औद्योगिक उत्पादने आणि सेवांचा ग्राहकांपर्यंत प्रचार करण्यासाठी एक प्रमुख माध्यम ठरले आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरी, यांनी, त्यांच्या अनोख्या प्रकाशनाच्या पायाभरणीसह, औद्योगिक व्यापार मेळावे आणि तांत्रिक परिषदांचे क्षेत्र सुव्यवस्थित करण्यासाठी केले आहे.

यावर्षी महाटेकने लघु व मध्यम उद्योगांसाठी एसएमई (SME) साठी तीन कार्यक्रम आयोजित केले आहेत

वेंडर डेव्हेलपमेंट मीट – ०९ फेब्रुवारी २०२४ (फक्त महाटेकच्या प्रदर्शकांसाठी)

ग्रोथ मार्केटिंग कॉन्फरन्स – १० फेब्रुवारी २०२४ वेळ: सकाळी ११ ते ४ (फक्त एसएमई साठी)

वेंडर डेव्हलपमेंट मीट :-  ही मीट ओईम (OEM) खरेदीदार आणि एसएमई (SME) पुरवठादार यांच्यातील परस्परसंवाद सुलभ करते. या  मीट मध्ये भारत फोर्ज लिमिटेड, ॲटमबर्ग टेक्नॉलॉजीज प्रा. लि., थरमॅक्स बॅबकॉक आणि विल्कॉक्स एनर्जी सोल्युशन्स लि., किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लि. आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., प्राज इंडस्ट्रीज हे ओईम (OEM) म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ग्रोथ मार्केटिंग कॉन्फरन्स:- ग्रोथ मार्केटिंग या  विषयावरील परिषदेचे आयोजन शनिवारी १० फेब्रुवारी २०२४ रोजी दोन सत्रात करण्यात आले आहे जे औद्योगिक SMEs ला प्रभावीपणे  डिजिटल मीडिया द्वारे व्यवसायाचे कसे प्रमोशन होईल ह्या संदर्भात परिसंवाद घेण्यात येईल. 

सेशन १:- एसएमई टु बिलियन डॉलर एम्पायर: मास्टरींग दि आर्ट ऑफ लिमिटलेस ऑर्गनायझेशन ग्रोथ श्री सुरेश मंशरमानी, व्यवसाय प्रशिक्षक, तजुर्बा येथील फाऊंडर, चीफ एनर्जी ऑफीसर हे, कि स्ट्रॅटेजिस फॉर ग्रोथ, फायनॅन्शियल मॅनॅजमेन्ट, टेकनॉलॉजि ऍण्ड डिजिटल ट्रान्सफॉरमेशन या प्रमुख धोरणांवर मार्गदर्शन करतील. 

सेशन २:- डिजिटल 360:  श्री. सुमुख मराठे, संचालक, मराठे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड हे नॅव्हिगेटिंग दि डिजिटल मार्केटिंग इकोसिस्टम फॉर SMEs, इंटिग्रेशन ऑफ डिजिटल प्लॅटफॉर्मस, जनरेशन ऑफ क्वालिटी     लीड्स, शोकेसिंग डिजिटल प्रेझेन्स थ्रू सोशिअल मीडिया या विषयांवर मार्गदर्शन करतील.

ही परिषद केवळ औद्योगिक SME साठी आहे. कॉन्फरन्स नोंदणी विनामूल्य आहे. इच्छुक SMEs https://maha-tech.com/conference-2024.php वर नोंदणी करू शकतात.

याविषयी अधिक माहिती देताना मराठे इन्फोटेक प्रा.लिचे संचालक श्री. विनय मराठे म्हणाले की, “आज महाटेकने पुण्यातील सर्वात मोठे B2B औद्योगिक प्रदर्शन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. महाटेक २०२४ ला उद्योगांकडून सहभागासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अनेक नामांकित भारतीय कंपन्या यावर्षी महाटेक २०२४ मध्ये त्यांची अत्याधुनिक उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी सहभागी होत आहेत.

“उत्पादन क्षेत्राला योग्य व्यासपीठ देऊन त्यांच्या वाढीला चालना देणे हे महाटेकचे ध्येय आहे. अनेक मोठ्या औद्योगिक उद्योजकांनी त्यांच्या उत्पादन आणि खरेदीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाटेक २०२४ ला भेट देणे अपेक्षित आहे.

महाटेक मध्ये सहभागी झालेल्या पुण्यातील काही नामांकित कंपन्या पुढीलप्रमाणे:-  शारंग कॉर्पोरेशन, वेल्ड टेक कॉर्पोरेशन, निशा इंजिनियरिंग वर्क्स, फ़िन्व्हेल्ड सिस्टीम, इंटॅक्ट ऑटोमेशन प्रा ली,  श्री परफोरेटर्स, गोकुळ ट्रेडर्स, एफ एस  कॉम्प्रेसर्स इंडिया प्रा ली , स्टॅंडर्ड मशीन टूल्स ट्रेडेस्क प्रा.ली, आर,बी इंटरनॅशनल बेल्टिंग,बुरुक इंटरनॅशनल.

COMMENTS