Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चेंबर साफ करताना 2 कामगारांचा मृत्यू

एकाचा शोध सुरू, पुण्यातील दुर्दैवी घटना

वाघोली येथून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोझे कॉलेज रस्ता इथल्या एका सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना घडली आहे.

आमदारांच्या अपात्रतेवर दिरंगाई नाही
राजकीय मोर्चेबांधणी
महाराष्ट्र सरकारवर मोठे आव्हान

वाघोली येथून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोझे कॉलेज रस्ता इथल्या एका सोसायटीच्या चेंबरमधे 3 कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी इथे धाव घेत अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाली आहे. नितीन प्रभाकर गौंड वय 45 आणि गणेश पालेकर वय 28 अशी मृतांची नावं आहेत. हे सर्व कंत्राटी कामगार असून संबंधित सोसायटीने हे चेंबर सफाईचं कंत्राट दिलं होतं. सकाळी सहा वाजता हे कामगार सफाई करताना या चेंबरमध्ये पडले. यात अडकून त्यांचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाने बाहेर काढले आहेत.

COMMENTS