Homeताज्या बातम्यादेश

केरळमधील कोझिकोड मध्ये निपाह व्हायरसमुळे २ जणांचा मृत्यू

केरळ प्रतिनिधी - केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निपाह व्हायरसम

मेस्मा की नवी नोकरभरती? लवकरच निर्णय घेणार असल्याचा इशारा
गड पर्यटनाला चालना देणार
पंजाबात राजकीय उलथापालथ… कॅप्टन अमरिंदरसिंगांनी स्थापन केला नवा पक्ष

केरळ प्रतिनिधी – केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निपाह व्हायरसमुळे दोन जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारला सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठवण्यात आल्याचं मांडविया यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना विषाणुचाही पहिला रुग्ण केरळमध्येच आढळून आला होता. त्यानंतरच संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूने हातपाय पसरले होते. निपाह विषाणूमुळे 30 ऑगस्ट रोजी पहिला मृत्यू झाला होता, त्यानंतर आता 11 सप्टेंबर रोजी दुसऱ्या रुग्णाची मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे सरकार गंभीर असून कोझिकोड परिसरात आरोग्य विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्या दोन रुग्णांचा मृत्यू झालायं, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे, मात्र, अद्याप केरळमध्ये निपाहचा प्रादुर्भाव झाल्याचं घोषित करण्यात आलेलं नाही.

COMMENTS