Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोहेगाव पतसंस्थेला 2 कोटींचा नफा – नितीनराव औताडे

नागरी पतसंस्थेची ठेवींची वाटचाल दोनशे कोटीकडे

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या पोहेगाव नागरी पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात विविध ग्राहकाभिमुख स

मुस्लिम समाज इफ्तार पार्टी, खजूरपुरता मर्यादित नाही !
भंडारदरा येथुन पळवुन नेलेल्या मुलीचा खुन
राहुरी शहरात नवरात्रोत्सव उत्साहात

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या पोहेगाव नागरी पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात विविध ग्राहकाभिमुख सेवांच्या जोरावर वर्षभरात तब्बल 2 कोटी 6 लाख 71 हजार 261 रुपयेचा नफा मिळवत ग्राहक सेवेस केंद्रस्थानी ठेवून केलेल्या पारदर्शक व्यवहारामुळे ठेवीदारांचा विश्‍वास संपादन करीत ठेवींमध्ये 12 कोटी 19 लाख 77 हजार 114 रुपये वाढ होऊन एकूण ठेवी 164 कोटी 30 लाख 87 हजार 944  इतक्या जमा होऊन आता संस्थेची ठेवीं कडे दोनशे कोटीकडे वाटचाल सुरू झाली असल्याची माहिती पोहेगांव नागरी  पतसंस्थेचे संस्थापक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी दिली आहे.
या प्रसंगी संस्थेची  मार्च 2024 अखेरच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे यांनी सांगितले की संस्थेची वार्षिक उलाढाल 1211 कोटी 56 लाख 55 हजार 614 रूपये  इतकी आहे, एकूण कर्ज वाटप 99 कोटी 40 लाख 56 हजार 639 रुपये, भाग भांडवल 1 कोटी 30 लाख 3 हजार 933 रुपये, संस्थेची 87 कोटी 38 लाख 66 हजार 275 रुपये गुंतवणूक आहे तर संस्थेची स्थावर मालमत्ता 2 कोटी 92 लाख 51 हजार 155 इतकी असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचा सीडी रेशो चे प्रमाण 60. 49 टक्के इतके आहे.संस्थेत उपलब्ध असलेल्या कोअर बँकिंग सुविधेमुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात सुलभता व तत्परता निर्माण झालेली आहे संस्थेचा प्रगतीचा आलेख संस्थेचे संस्थापक नितिनराव औताडे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे ,उपाध्यक्ष विलासराव रस्ते व सर्व संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक सुभाष औताडे, पोहेगांव शाखेचे व्यवस्थापक विठ्ठल घारे, शिर्डी शाखेचे व्यवस्थापक सोमनाथ मोजड, कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक कोल्हे, वसुली अधिकारी, सभासद,ठेविदार, कर्मचारी व कलेक्शन प्रतिनिधी यांच्या सर्वांच्या सहकार्याने वाढतच चाललेला आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी संस्थेने सुसज्ज अशी कोपरगाव शाखेसाठी इमारत उपलब्ध करून दिले आहे. अत्याधुनिक सेवा, स्ट्राँग रूम, वीज बिल भरणा केंद्र, आरटीजीएस, एनएफटी सोनेतारण कर्ज अदि सुविधा मुळे व पारदर्शक व्यवहारामुळे ठेवीमध्ये वाढ होत आहे. संस्थेच्या पोहेगाव कोपरगाव शिर्डी परिसरातील शाखांमार्फत व्यवसाय वाढवणे, बाजारपेठेला हातभार लागावा व बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने संस्थेच्या शाखेमार्फत कर्ज वितरण करण्यात येते संस्थेचे कर्जवाटप व वसुली यापुरतेच कार्य नसून संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मोफत सर्वरोग निदान शिबीर, मोतीबिंदू शिबीर व विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याची माहितीही नितीनराव औताडे यांनी दिली.

COMMENTS