मुखेड प्रतिनिधी - मुखेड तालुक्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला तर वीज पडून 2 म्हसी व 1 बैल ठार झाल्याची घटना घडली.तर उन्हाळी पिकांचे मोठे नुकसा

मुखेड प्रतिनिधी – मुखेड तालुक्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला तर वीज पडून 2 म्हसी व 1 बैल ठार झाल्याची घटना घडली.तर उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील मुक्रमाबाद जवळील बिहारीपूर येथील शेतकरी गंगाधर बापुराव सूर्यवंशी यांची म्हैस तर डोंगरगाव येथील शेतकरी नागोराव मरीबा लोहाळे यांचा बैल व सांगवी (बे.)येथील शेतकरी उमाकांत वीरभद्र मस्कले यांची म्हैस रात्री अंदाजे 2 च्या सुमारास वीज पडून एकूण तीन जनावरे दगावली. या अकाली पावसाने उन्हाळी पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांंचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे. दरम्यान मध्यरात्री अचानक वीज कडाडून अवकाळी पाऊस सुरू झाला. अनेक शेतकर्यांच्या शेतातील पीक व फळबागेचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतकर्यांच्या पाठीमागील अस्मानी संकटांची मालीका चालूच असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
COMMENTS