Homeताज्या बातम्यादेश

भावाच्या लग्नात नाचताना 19 वर्षीय मुलाचा मृत्यू

नवी दिल्ली प्रतिनिधी - चालता-बोलता, नाचताना किंवा जिममध्ये अचानक लोकांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजकाल समोर येत राहतात. अनेकदा हा मृत्यू सी

निरोगी खाण्याबाबत टिपा
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात आरोग्य, रोजगार, माहितीचे 30 स्टॉल
सेन्सेक्सने ओलांडली 70 हजारांची पातळी

नवी दिल्ली प्रतिनिधी – चालता-बोलता, नाचताना किंवा जिममध्ये अचानक लोकांचे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजकाल समोर येत राहतात. अनेकदा हा मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतो आणि त्याचे व्हिडिओही समोर येतात. हैराण करणारी बाब म्हणजे, अशा घटनांमध्ये बहुतांश पीडित हे तरुण असतात आणि त्यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असतं. आता अशीच काहीशी आणखी एक घटना समोर आली आहे. दिल्लीत बदली व्हिलेजच्या जेजे कॅम्पमध्ये चुलत भावाच्या लग्न समारंभात नाचत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश असं त्याचं नाव असून तो केवळ 19 वर्षांचा होता. आकाश खाली कोसळताच त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात नेलं. मात्र काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनं एकच खळबळ उडाली. लग्नसमारंभात आनंदाने नाचत असलेल्या आकाशला नेमकं काय झालं? असा प्रश्न आता उपस्थित होतो. घटनेच्या वेळी त्याचे पालक त्याच्यासोबत होते. तसंच याप्रकरणात आकाशसोबत कोणी काही चुकीचं केलं असल्याचा संशय नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत. अशा अनेक घटना आल्यात समोर – लग्नात नाचताना हसत्या खेळत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नाही. अशा अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. फेब्रुवारीमध्येही अशीच काहीशी एक घटना समोर आली होती. यात वरातीमध्ये डीजेच्या तालावर नाचता नाचता तरुण खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. विश्वनाथ जानगेवाड वय 18 वर्ष असं या तरुणाचं नाव होतं. तो नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातल्या शिवणी गावातील रहिवासी होता. नाचता-नाचता हृदयविकाराचा झटका आल्यानं या तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.

COMMENTS