Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विद्यापीठाच्या परिसरात 19 वसतिगृह कार्यान्वित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात मुलांची 9 तर मुलींची 10 अशी एकूण 19 वसतिगृह कार्यान्वित आहेत. विविध अभ्यासक्रमांना प्रवेशि

पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…
तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी
एक राखी जवानांसाठी उपक्रमाचा रेणुका कोल्हेंच्या हस्ते शुभारंभ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात मुलांची 9 तर मुलींची 10 अशी एकूण 19 वसतिगृह कार्यान्वित आहेत. विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित साधारण 5 हजार विद्यार्थ्यांची वसतिगृहाची मागणी असून विद्यापीठ परिसरात गुणवत्ता व सामाजिक आरक्षण याचा विचार करून 3 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवासाची सोय करण्यात आली आहे.


विद्यार्थ्यांची वसतिगृहाची वाढती मागणी लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह खोल्यांमध्ये जेथे जेथे शक्य आहे याठिकाणी अधिकच्या कॉट टाकून वसतिगृहांची क्षमता वाढवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वसतिगृहात सामावून घेतले आहे. मात्र असे करताना प्रत्यक्ष राहत असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यायोग्य सुविधा देण्यासाठी व्यवस्थेच्या क्षमतांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेतली आहे. वसतिगृहाच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठाने बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केलेली असून यापुढे 14 डिसेंबर पासून केवळ वसतिगृहात प्रवेशीत विद्यार्थ्यांनाच या यंत्रणेद्वारे प्रवेश दिला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. वसतीगृहात प्रवेशित नसणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांची सोय त्यांच्या स्तरावर इतरत्र करणे आवश्यक असून याबाबत विद्यार्थ्यांनी कोणत्याही नियमबाह्य आंदोलनात सहभागी होऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या प्रश्‍नावर विद्यापीठ प्रशासन अत्यंत संवेदनशील असून भविष्यात रीक्त होणार्‍या जागांवर अथवा नव्याने निर्माण होणार्‍या जागांवर टप्प्याट्प्याने विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाईल. सर्वांनी याबाबत विद्यापीठाला सहकार्य करावे.

COMMENTS