महाराष्ट्रात एका वर्षात 183 जणींची अनैतिक संबंधातून हत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात एका वर्षात 183 जणींची अनैतिक संबंधातून हत्या

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिलांसाठी सुरक्षित समजले जात असून, बिहार, उत्तरप्रदेशातील बोकाळणारी गुन्हेगारी राज्यात नसल्याचे समजले जात होते. महात्मा फुल

नोकरीच्या आमीषाने 8 तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक
राज्यपालांसाठी मार्गदर्शक सूचनांची चाचपणी
अवघ्या 100 तासात बनवला 100 किलोमीटरचा रस्ता

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिलांसाठी सुरक्षित समजले जात असून, बिहार, उत्तरप्रदेशातील बोकाळणारी गुन्हेगारी राज्यात नसल्याचे समजले जात होते. महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून नेहमीच राज्याचे कौतुक केले जाते. मात्र गेल्या एका वर्षांत तब्बल 63 हजार महिला बेपत्ता झाल्यामुळे राज्यातील महिला सुरक्षित आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अर्थात एनसीआरबीच्या अहवालातून हादरवणारी माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील तब्बल 63 हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी जवळपास 23 हजार महिलांविषयीचे गूढ अद्यापही कायम आहे. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काळजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2 हजार 163 हत्येच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये 564 महिलांचा समावेश होता. त्यापैकी 116 जणींची प्रेम प्रकरणातून, तर 183 जणींची अनैतिक संबंधांतून हत्या झाल्याची माहिती आहे. हुंडाबळी गेलेल्या महिलांचे प्रमाणही लक्षणीय असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षात महिलांविरोधातील सर्वाधिक गुन्हे (49 हजार 385) उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले होते. यामध्ये खून, बलात्कार, लैंगिक अत्याचार, विनयभंग, अपहरण, हुंडाबळी यासारख्या विविध गुन्ह्यांचा समावेश होतो. 2021 वर्षातील पहिल्या 11 महिन्यात मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी 999 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी 859 गुन्ह्यांची उकल झाली आहे. मात्र 140 बेपत्ता मुलींचं गूढ अजूनही कायम आहे. आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील सर्वाधिक व्यक्ती बेपत्ता आहेत. त्यांची संख्या एक लाख 9 हजार 585 च्या घरात आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील 63 हजार 252 महिला बेपत्ता झाल्या असून 23 हजार 157 जणींचा शोध अजूनही लागलेला नाही. या आकडेवारी महाराष्ट्रातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि बेपत्ता होणार्‍या महिलांचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होतांना दिसून येत आहे.

महिलांविरोधी गुन्ह्यात महाराष्ट्र चौथ्या स्थानी
देशभरात महिलांविरोधातील गुन्ह्यात उत्तरप्रदेश नंतर पश्‍चिम बंगामध्ये 36 हजार 439 आणि राजस्थान 34 हजार 535यांचा क्रमांक लागतो. तर या यादीत महाराष्ट्र 31 हजार 954 चौथ्या स्थानावर आहे. आदल्या वर्षीच्या म्हणजेच 2019 च्या तुलनेत राज्यातील महिलांविरोधी गुन्ह्यांचा आकडा 5 हजार 190 ने घटले आहे.

COMMENTS