नागपूर/प्रतिनिधी ः नागपूर जिल्ह्यातील उमरेड पवनी कर्हाडंला अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये शहरातील बडे उद्योगपती आणि डॉक्टर महिलांसह न्यूड डॉन्स क
नागपूर/प्रतिनिधी ः नागपूर जिल्ह्यातील उमरेड पवनी कर्हाडंला अभयारण्यातील एका रिसॉर्टमध्ये शहरातील बडे उद्योगपती आणि डॉक्टर महिलांसह न्यूड डॉन्स करतांना रंगेहात सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या रिसॉटवर मुलींना नाचवत अश्लील नृत्य सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या रिसॉटवर छापा टाकत तब्बल 6 मुली आणि 18 जणांचा अटक केली.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. उमरेड तालुक्यातील तिरखुरा येथील टायगर पॅराडाईज रिसॉर्टमध्ये हा धिंगाणा सुरू होता. या प्रकारची माहिती नागपूर पोलिसांच्या एलसीबीच्या पथकाला मिळाली. या पथकाने या रिसॉटवर छापा टाकला. यावेळी येथे असणार्यांची धावपळ उडाली. पोलिसांपासून वाचण्यासाठी सर्व जण पळू लागले. मध्यरात्री सुरू केलेली कारवाई सकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईत 6 मुलींसह 18 जणांना अटक करण्यात आली आहे. यात नागपूर, मौदा येथील अनेक नामवंत डॉक्टर आणि व्यावसायिकांचा सामील आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या रिपोर्टमध्ये मुली अश्लील डान्स करत असून या ठिकाणी आजूबाजूला बसलेले लोक खुर्च्यांवर बसून दारू पीत असून नाचणार्या मुलींवर ते पैसे उधळत असतांना या व्हिडिओत दिसत आहे. या पूर्वी उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी येथे ’न्यूड डान्स’ प्रकरण पुढे आले होते. या कारवाईमध्येही बडी मंडळी सामील होती.
COMMENTS