Homeताज्या बातम्यादेश

नेपाळमध्ये विमान कोसळून 18 जणांचा मृत्यू

काठमांडू ः नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमान कोसळून 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर कॅप्टन मनीष शाक्य गंभीर जखमी अवस्थेत असून, त्यांना रुग्णा

ब्राझीलमध्ये विमान अपघातात 14 प्रवाशांचा मृत्यू
नेपाळची राजधानी काठमांडू येथे मोठी विमान दुर्घटना
पुतिन विरोधक वॅग्नरप्रमुख प्रिगोझिनचा विमान अपघातात मृत्यू

काठमांडू ः नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये विमान कोसळून 18 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर कॅप्टन मनीष शाक्य गंभीर जखमी अवस्थेत असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विमानात पायलटसह 19 प्रवासी होते. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. बुधवारी सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. काही क्षणातच ते कोसळले. 9 एन-एएमई हे विमान सूर्या एअरलाइन्सचे होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 17 सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित 2 क्रू मेंबर्स होते.
मिळालेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये आज सकाळी 11 च्या सुमारास हे विमान टेक ऑफ दरम्यान कोसळले. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर ही दुर्घटना घडली. विमान कोसळात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. विमानतळावर दूर वरून आगीचे लोळ दिसत होते. काठमांडू येथून पोखराला जाणार्‍या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 19 जण होते. नेपाळमधील हवाई उद्योग गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढला आहे. तसेच अनेक अवघड आणि डोंगराळ भागात सेवा देत आहे. मात्र, निकृष्ट सुरक्षा व्यवस्था आणि प्रशिक्षणाचा अभाव यामुळे येथे अनेकदा अपघात घडतात. नेपाळमध्ये दरवर्षी सरासरी एक विमान अपघात होतो. 2010 पासून आतापर्यंत 12 विमाने कोसळली आहेत. 14 जानेवारी 2023 रोजी येथे एक मोठा विमान अपघात झाला होता. काठमांडूपासून 205 किमी अंतरावर पोखरामध्ये यति एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. हे एटीआर-72 विमान होते, ज्यामध्ये 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.

COMMENTS