कोपरगाव शहर ःयंदाचासदगुरू गंगागिरी महाराजांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे होणार असल्याचे निश्चित झाले अस
कोपरगाव शहर ःयंदाचासदगुरू गंगागिरी महाराजांचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे होणार असल्याचे निश्चित झाले असून या साठी पंचाळे व पंचक्रोशीतील भाविकांनी सप्ताह मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून मागणी लावून धरली होती.सिन्नर तालक्यातील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ व भाविकानी सप्ताहाच्या मागणीसाठी श्री क्षेत्र सरला बेट येथे महंत रामगिरिजी महाराजांची भेट घेतली असता तयारीला लागा असे सूचक वक्तव्य त्यांनी करताच सर्वांनीच हरिनामाचा गजर करत आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी महंत रामगिरिजी महाराज मार्गदर्शन करताना म्हणाले की, सदगुरू गंगागिरी महाराजांची ईच्छा असेल तेथेच सप्ताह होत असतो. योग घडून यावा लागतो.तेच सर्व आपल्याकडून करून घेतात. ते त्यागी संत होते.संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी ही त्यांनीच शोधलेली आहे. सन 1895 मधे गंगागिरी महाराज यांनी पंढरपूर येथे मोठा सप्ताह केला. सुमारे 700 पोते साखरेचे लाडूचां प्रसाद वाटप केला होता. वारकरी संप्रदायात फार मोठे कार्य त्यांनी केले आहे. आज सप्ताहाचे स्वरूप अधिक मोठे होत आहे. नियोजनही मोठ्या प्रमाणावर करावे लागते त्यामुळे सप्ताहाच्या तयारीला लागावे परंतु नारळ मात्र परंपरेनुसार पुणतांबा येथेच दिला जाईल असे सूचक वक्तव्य मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी यावेळी केले. सप्ताह मागणीसाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य कु. सिमिंतीनी कोकाटे, मा.पंचायत समिती सदस्य विजय गडाख, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती केशव कोकाटे, सरपंच संभाजी जाधव, मच्छिंद्र चीने, भारत कोकाटे, मा. बांधकाम सभापती राजेंद्र चव्हाणके, संचालक अरुण येवले, विठ्ठलराव आसने, शिवाजी म.भालुरकर, शिवाजी म.ठाकरे, सुभाष म. गेठे, किशोर म.खरात, किसन म.काकड, रेखाताई म.काकड, नागेश म. गोरडे, महेश म. भगुरे, रामभाऊ चव्हाणके, संतोष चव्हाणके, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक खुळे, नवनाथ मुरडणर, नवनाथ गडाख, कुष्णा घुमरे, शरद थोरात, सरपंच निवृत्ती सापनर, दत्तात्रय पवार, परशुराम कथले, केदूनाना पवार, अरुण वाघ, विनायक तांबे, वाल्मीक म.हांडोरे राजेंद्र डुंबरे, फकीर बोरनारे, सुनील काजळे, शिवाजी उंडे, पावडे महाराज, संपत वाणी, गोरख म. कासार आदीसह पंचाळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS