Homeताज्या बातम्यादेश

17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

मध्य प्रदेश- गेल्या काही महिन्यांपासून भारतात हृदयविकाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मग तो म्हातारा असो वा लहान मूल. हृदयविकाराच्या झटक्या

मतदान रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
गदर-2 पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू
ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मध्य प्रदेश- गेल्या काही महिन्यांपासून भारतात हृदयविकाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मग तो म्हातारा असो वा लहान मूल. हृदयविकाराच्या झटक्याला सर्व वयोगटातील लोकबळी पडत आहेत. याच क्रमाने मध्य प्रदेशातील छतरपूरमधूनही हृदयविकाराच्या झटक्याची बातमी समोर आली आहे.  येथील एका शाळेत सोमवारी सकाळी 17 वर्षीय विद्यार्थी प्रार्थनेदरम्यान अचानक कोसळला. छतरपूरच्या महर्षी विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याला अचानक  शाळेत प्रार्थना सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर अचानक तो बेशुद्ध पडला. शाळेतील सहकाऱ्यांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सार्थकला वाचवता आले नाही.  शाळेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंब हळहळले आहे.मृत सार्थक टिकरिया हा प्रसिद्ध उद्योगपती आलोक टिकरिया यांचा मुलगा होता. महर्षी विद्या मंदिर शाळेत तो दहावीचा विद्यार्थी होता. 

COMMENTS