कोटा ः देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असून, राजस्थानच्या कोटा शहरातही शुक्रवारी भगवान शंकराची मिरवणूक निघाली होती. मात्र या मिरवणुकीदरम्यान एक दुर

कोटा ः देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह असून, राजस्थानच्या कोटा शहरातही शुक्रवारी भगवान शंकराची मिरवणूक निघाली होती. मात्र या मिरवणुकीदरम्यान एक दुर्घटना घडली असून त्यात 17 मुले भाजली गेली आहेत. कोटा शहरातील काली बस्ती याठिकाणी ही दुर्घटना घडली.
कोटाच्या पोलीस अधिक्षक अम्रिता दुहन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही खूपच दुःखद घटना घडली. काली बस्ती परिसरातील लोक महाशिवरात्रीनिमित्त कलशमध्ये पाणी भरण्यासाठी मिरवणूक काढत होते. यात 20 ते 25 मुलं आणि तेवढ्याच संख्येने महिलाही होत्या. त्यातील एका मुलाकडे 20 ते 22 फुटांच्या लोखंडी पाईपला लावलेला एक झेंडा होता. हा झेंडा रस्त्यावरील हायटेन्शन तारेला लागला. ज्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला. त्याला वाचविण्यासाठी इतर मुले पुढे सरसावले मात्र त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. एमबीबीएस हॉस्टिपलमध्ये सर्वांवर उपचार केले जात आहेत. दुहन पुढे म्हणाल्या की, ज्या मुलाच्या हातात झेंडा होता, तो गंभीररित्या भाजला गेला आहे. तर इतर मुलांनाही जखम झाली आहे. या घटनेची निश्चितच चौकशी केली जाईल.
COMMENTS