Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटीच्या संपामुळे टीईटी परीक्षेस 1634 गैरहजर

सातारा / प्रतिनिधी : शहरातील 13 केंद्रांवर आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीची परीक्षा सुरळीत झाली. परीक्षेच्या पहिल्या व दुसर्‍या पेपरस

मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया महिनाअखेर होणार
पर्यटन मंत्र्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करण्याची गरज : आ. शशिकांत शिंदे
सातार्‍यात वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापणार्‍या 16 जणांना अटक

सातारा / प्रतिनिधी : शहरातील 13 केंद्रांवर आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीची परीक्षा सुरळीत झाली. परीक्षेच्या पहिल्या व दुसर्‍या पेपरसाठी एकूण 1 हजार 634 उमेदवार गैरहजर होते. एसटी संप आणि सततच्या पावसामुळे उमेदवारांच्या गैरहजेरीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.
टीईटी परीक्षेला उमेदवारांनी शहरातील परीक्षा केंद्रांवर सकाळपासून गर्दी केली होती. मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू या माध्यमातून ही परीक्षा झाली. मराठी माध्यमासाठी 5 हजार 302 पैकी चार हजार 485 परिक्षार्थी उपस्थित होते. इंग्रजी माध्यमासाठी 223 पैकी 191, उर्दू विषयासाठी 21 पैकी 18, हिंदी विषयासाठी 29 पैकी 28 अशा चार हजार 719 शिक्षकांनी पेपर एकसाठी परीक्षा दिली. त्यामध्ये, पहिल्या पेपरसाठी 856 जण गैरहजर होते.
पेपर दोनच्या मराठी माध्यमासाठी 5 हजार 301 पैकी 4 हजार 575, इंग्रजी माध्यमासाठी 268 पैकी 224, उर्दू माध्यमासाठी 20 पैकी 15, हिंदी माध्यमासाठी 29 पैकी 26 अशा 4 हजार 840 जणांनी परीक्षा दिली. पेपर दोनसाठी 778 जण गैरहजर होते. दरम्यान, या परीक्षेसाठी शहरातील 13 केंद्रावर परीक्षा झाली.

COMMENTS