कोरेगांव / प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील शेंदूरजणे येथे टाटा सुमो वाहनातून जिलेटीनच्या 1600 कांड्या जप्त करण्यात आल्या. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल
कोरेगांव / प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील शेंदूरजणे येथे टाटा सुमो वाहनातून जिलेटीनच्या 1600 कांड्या जप्त करण्यात आल्या. दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत टाटा सुमो जीपसह 2 लाख 17 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दि. 9 रोजी दहशतवाद विरोधी पथकातील अंमलदार पेट्रोलिंग करत असताना स्फोटकांची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने तातडीने शेंदूरजणे, ता. कोरेगाव येथे सापळा रचला. त्यावेळी चालक संतोष हिंदूराव पवार (वय 38, रा. धावडशी, ता. सातारा) हा चालक टाटा सुमोसह आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गाडीची झडती घेतली असता गाडीत 1600 जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या. त्याच्याकडे वाहनाचा परवाना, जिलेटीन कांड्या वाहतुकीचा परवाना अथवा माल खरेदीच्या पावत्या नव्हत्या. जिलेटीन कांड्या शेरखान अल्लाबेली मन्सुरी (रा. सातारा) यांनी वाहतूक करण्यास सांगितले असल्याचे कबूल केले. दहशतवाद विरोधी पथकाने चालक पवार यास अटक करुन कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
COMMENTS