Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लासलगांव विंचूर सह 16 गाव पाणी पुरवठा प्रश्न गंभीर पाणी प्रश्न त्वरित मार्गी लावा अन्यथा   

शिवसेना निफाड पूर्व तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांचा महाराष्ट्र दिनी उपोषणचा इशारा.

निफाड प्रतिनिधी - निफाड तालुक्यातील   विंचूर लासलगाव 16 गाव पाणीपुरवठा च्या ढीसाळ नियोजनमुळे नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल आणि गढूळ पाणी प

दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला’ | LokNews24
केदारेश्वर मंदिरात साजरा झाला दिपोत्सव
राहुल गांधींच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल

निफाड प्रतिनिधी – निफाड तालुक्यातील   विंचूर लासलगाव 16 गाव पाणीपुरवठा च्या ढीसाळ नियोजनमुळे नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेले हाल आणि गढूळ पाणी पुरवठा प्रकरणी निफाड तालुका पूर्व शिवसेनाप्रमुख प्रकाश पाटील यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना पत्र व्यवहार करत आमरण उपोषणाचा इशारा. निवेदनात असे म्हटले आहे की लासलगाव-विंचूर सह 16 गाव पाणीपुरवठा सध्या खूप विस्कळीत झाला आहे. ऐन मार्च- एप्रिल महिन्यात ऊन वाढत असून शिवाय सर्वधर्मीयांचे धार्मिक सण उत्सव  सुरू होते या काळात लासलगावचा पाणीपुरवठा पुन्हा जाणीवपूर्वक विस्कळीत केला जात होता .तब्बल  वीस ते बावीस दिवस झाले,तरी  सुद्धा पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला  जात नाही.शिवाय  कोणतेही कारण नसताना जनतेला पाण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार समिती व सचिव करत आहे.मा.पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांकडे आम्ही दि.25/09/2022 रोजी पाणीपुरवठा नियोजना संदर्भात कैफियत मांडली होती त्यावर आपण ऑक्टोबर 2022 मध्ये सदरील योजनेची पाहणी करून सूचना केल्या होत्या.त्या नंतर किमान  पाच सहा दिवसाआड पाणी पुरवठा सुरु होता तोदेखील अशुध्द तसेच विंचुर सह सोळा गाव पाणीपुरवठा देखभाल दुरूस्ती करणार्‍या समितीकडुन नांदुमध्यमेश्‍वर धरणातुन येणार्‍या पाण्यास विंचूर येथील जल शुध्दिकरण केंद्र हे अत्याधुनिक यंत्रसामुग्री ने परिपुर्ण असुन देखील त्याचा कुठल्याहि प्रकारे कित्येक वर्षापासुन वापर होत नसल्याणे बंद स्थितीत आहे,त्यामध्ये प्रमुख आलम व टि.सी.एल. पावडर मिक्सरबंद आहे तसेच पाण्यासाठी सेटलमेंट टँक (मिक्सर) बंद आहे,जल शुध्दिकरणासाठी वापरली 

जाणारी वाळु देखील अनेक वर्षापासुन बदलेली नसल्यामुळे फिल्टर बेड देखील खराब झाले आहे. बॅकवॉश वॉटर चे उपकरण व क्रोलींग गॅस युनिट बंद आहे तसेच वरिल कारणांसाठी वापरले जाणारे  विज पंप हे देखील धुळकात पडुन आहे  त्यामुळे लासलगाव विंचूर सह सोळा गाव देखभाल दुरूस्ती समिती कडुन राजरोजपणे नागरीकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा तो देखील वीस ते बावीस दिवसाआड करून नागरीकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असुन सध्या नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. लासलगाव विंचूर सह सोळा गाव पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती योजना समितीचे पदाधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असून,आपण चौकशी  करून सदरची समिती बरखास्त करावी तसेच कामात दिरंगाई  करणार्‍या समितीच्या सचिवावर कडक कारवाई करावी व नवीन अधिकारी नेमणूक करून नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नळाव्दारे किमान दिवसा आड करावा अशी पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या वतीने तसेच आम्ही आपणास दि.03/04/2023 रोजी प्रत्यक्षात भेटून पत्रक देऊन कळकळीची विनंती केली होती आज 25 ते 26 दिवस होवून देखिल आपण आमच्या तक्रारीची गांभीर्यपुर्वक दखल घेतलेली नाही,असे आमच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे 1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनी सकाळी 11 वाजता लासलगाव ग्रामपंचायत कार्यालय आवारात  शूध्द पिण्याच्या पाण्याच्या समस्या सुटत नाही तो पर्यंत आमरण उपोषनाला बसण्याचा ईशारा शिवसेना  निफाड तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी दिला आहे.सदर प्रत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ,राज्य आरोग्य मंत्री ,गटविकास अधिकारी पंचायत समिती निफाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक लासलगाव पोलीस स्टेशन ,अध्यक्ष व सचिव  विंचूर लासलगाव 16 गाव पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्ती समिती यांना देण्यात आली आहे.

COMMENTS