Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

14 महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

भंडारा- जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. एका १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंगणातील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला

क्रीडाक्षेत्रातील लैंगिक शोषण
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
रस्त्याच उद्घाटन फटाके फोडत गुत्तेदारांनी केला स्वतःचा मोठेपणा

भंडारा- जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. एका १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंगणातील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास राजापूर गावात घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अदिक अतुल शहारे (वय १४ महिने) असे मृत बाळाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अदिकचे वडील अतुल शहारे काही कामासाठी घराबाहेर गेले होते. आई घरकामात व्यस्त असल्याने त्यांनी अदिकला शेजाऱ्यांच्या घरी नेऊन सोडलं. पण तेथून अदिक खेळत-खेळत घराकडे आला. दरम्यान, खेळता-खेळता अदिक अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ गेला. टाकीचे झाकण उघडे असल्याने त्याचा पाय घसरून बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर अदिकचे वडील घरी आले. त्यांनी शेजारच्यांना अदिक कुठे आहे, असं विचारलं असता तो घराकडे गेला आहे, असं शेजारच्यांनी सांगितलं. वडिलांनी शोधाशोध केली असता, अदिक कुठेही दिसून आला नाही. दरम्यान, त्यांनी पाण्याच्या टाकीत डोकावून बघितलं असता. अदिक हा तरंगताना दिसून आला. त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याआधीच अदिकचा मृत्यू झाला होता. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS