Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे 13 नवे रूग्ण

मुंबई ः देशभरात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढतांना दिसून येत आहे. केरळमध्ये नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर मुंबईमध्येही कोरोनाचे रु

आरोपीचा पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न
वृद्ध महिलेस लोक न्यायालयात तात्काळ न्याय मिळाला व दुभंगलेली
आगडगाव काळभैरवनाथ देवस्थान परिसरात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय

मुंबई ः देशभरात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढतांना दिसून येत आहे. केरळमध्ये नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळून आल्यानंतर मुंबईमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसून येत आहे. मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 13 रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रूग्ण मुंबईमधीलच आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 24 आहे. कोरोना संक्रमित सर्वच रुग्णांना होम कॉरंटाइन करण्यात आले आहे. कोणत्याही रुग्णवर रुग्णालयात उपचार सुरू नाहीत.
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी कोरोना संक्रमित रुग्ण आढळू लागले. 22 ते 27 नोव्हेंबर दरम्यान 8 व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या. 11 डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्या 12 वर पोहचली. तर आतापर्यंत रुग्णांचा आकडा 24 वर पोहचला आहे. आगामी सण उत्सवांचा काळ लक्षात घेता, राज्यांनी पुरेशा सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था सज्ज ठेवाव्यात. रुग्णसंख्येचा वाढता कल लवकर ओळखण्यासाठी, फ्लू सारखे आजार किंवा गंभीर स्वरूपाच्या श्‍वसन रोगावर लक्ष ठेवण्यासाठी याबाबत वेळोवेळी अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या रक्ताचे नमुने, भारतीय सार्स सीओव्ही-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.  

COMMENTS