Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायती व 15 सरपंच झाले बिनविरोध

निवडणुकीची रणधुमाळी रंगात

अहमदनगर प्रतिनिधी - जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायती व 15 सरपंच बिनविरोध निवडले गेले आहेत. आता सरपंचपदाच्या 188 जागा व 195 ग्रामपंचायतींच्या 1662 सदस्यांस

BREAKING: पीपीई किट घालून मर्डर … बॉडी फेकली हायवे जवळच्या जंगलात | पहा Lok News24
शिष्यवृत्ती परीक्षा ही एमपीएससी परीक्षेची पूर्वतयारी :- अभय आव्हाड 
प्राथमिक शिक्षक बँक बिनविरोध?…इब्टाने घेतला पुढाकार

अहमदनगर प्रतिनिधी – जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायती व 15 सरपंच बिनविरोध निवडले गेले आहेत. आता सरपंचपदाच्या 188 जागा व 195 ग्रामपंचायतींच्या 1662 सदस्यांसाठी रविवारी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. गावोगावी निवडणुकीची रणधुमाळी रंगू लागली आहे.


जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत तर सर्वमिळून 1965 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. सर्व जागांसाठी मिळून सव्वाआठ हजारावर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यात सरपंचांच्या 203 जागांसाठी 1 हजार 282 तर सदस्यांच्या 1 हजार 922 जागांसाठी 7 हजार 94 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. माघारीनंतर ही संख्या बरीच कमी झाली आहे. पण जिल्हा प्रशासनाकडे त्याची आकडेवारी संकलित होत आहे. पण माघारीच्या दिवशी अनेक रणछोडदास झाल्याने आता 13 ग्रामपंचायती व 15 सरपंचपदे बिनविरोध झाली आहेत तसेच 228 सदस्यपदेही बिनविरोध निवडली गेली आहेत. आता 195 ग्रामपंचायतींतील 1662 सदस्यपदांसाठी तसेच 188 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने गावोगावी प्रचाराचा धुराळा उडाला आहे.


राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर व शिंदे-फडणवीसांचे सरकार सत्तेत आल्यानंतर होणार्‍या ग्रामीण भागातील या पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमदेवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांची भाऊगर्दी होती व नंतर रिंगणातून माघार घेण्यासाठीही गर्दी उसळली. त्यामुळे माघारीच्या दिवशी चक्क रांगा लागल्या होत्या. परिणामी, जिल्हा स्तरावर याबाबतची माहिती संकलनास चक्क दोन दिवस उशीर झाला. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची असून राज्यातील सत्तांतरानंतर होणार्‍या या ग्रामपंचायत निवडणुकीला महत्व आले आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागावर कोणाची पकड आहे, याची चाचणी होणार आहे.

COMMENTS