Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीसह ठाकरे गटाचे 13-14 आमदार फुटणार

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा दावा

रत्नागिरी/प्रतिनिधी ः महाराष्ट्रातील राजकारण शिगेला पोहचले असून, राष्ट्रवादी काँगे्रस आणि ठाकरे गटातील 13-14 आमदार शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटाच

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर एक भीषण अपघात | LOKNews24
फार्महाऊसचे छत कोसळून 5 जणांचा मृत्यू
शिवसेना महिला नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला 

रत्नागिरी/प्रतिनिधी ः महाराष्ट्रातील राजकारण शिगेला पोहचले असून, राष्ट्रवादी काँगे्रस आणि ठाकरे गटातील 13-14 आमदार शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस आणि ठाकरे गटातील ते आमदार कोण, यावर चर्चा सुरू झाली आहे. रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलतांना सामंत यांनी हा दावा केला आहे. उदय सामंत म्हणाले की, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील 13 ते 14 आमदार आमच्याकडे येणार आहेत हे नक्की. कोण आमच्यात येणार आहेत ते त्यांना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच माहित, असे उदय सामंत यांनी सांगितले.

COMMENTS