Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील 125 कृषी उपसंचालक सामूहिक रजेवर

पदोन्नतीची फाईल अडकवल्यामुळे संताप

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधातील संताप वाढत असतांनाच, कृषी विभागात देखील सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे

शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी ः राजेश परजणे
‘आठवा रंग प्रेमाचा’ सिनेमातील रिंकू राजगुरुचा लूक रिव्हील | LOKNews24
जिल्हा व्हाॅलीबाॅल संघटना आयोजित पंच परीक्षेत 37 पंचाची निवड

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधातील संताप वाढत असतांनाच, कृषी विभागात देखील सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. टीईटी घोटाळा, गायरान जमीन घोटाळा, कृषी महोत्सवासाठी 15 कोटी वसुलीप्रकरणी कृषीमंत्री सत्तार गोत्यात आले असतांना आता कृषीविभागातील 125 कृषी उपसंचालकांनी सामूहिक रजेचे अस्त्र उगारले आहे.

पदोन्नतीची फाइल अडकवल्याच्या कारणास्तव राज्यातील 125 कृषी उपसंचालकांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील कृषी महोत्सवावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी सोमवारपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या कृषी विभागाने 30 डिसेंबर रोजी केवळ दोन कृषी उपसंचालकांना सेवानिवृत्तीच्या एक दिवसापूर्वी पदोन्नती देऊन चेष्टा केली. त्याचा कृषी सेवा वर्ग 1 अधिकारी संघटनेने निषेध केला आहे. पदोन्नतीस पात्र इतर कृषी उपसंचालकांना 31 डिसेंबरपर्यंत पदोन्नतीचे आदेश कृषी विभागाने दिले नसल्याने राज्यातील कृषी उपसंचालक संतप्त झालेले आहेत. कृषी उपसंचालक संवर्गातील अधिकार्‍यांना अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गात पदोन्नतीचे आदेश 31 डिसेंबरपर्यंत मिळण्याची मागणी कृषी सेवा वर्ग 1 अधिकारी कल्याणकारी संघटनेने कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडे 12 डिसेंबर रोजी केली होती. ज्या अधिकार्‍यांची विभागीय चौकशी झालेली आहे, त्या अधिकार्‍यांच्या नावाचाही पदोन्नतीच्या यादीत समावेश करण्यात याव्या अशा मागण्या कृषी संघटनेने केल्या आहेत.

COMMENTS