Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी प्रतितास 1200 भाविकांना प्रवेश

कोल्हापूर / प्रतिनिधी : कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रूग्ण सापडल्यानंतर महाराष्ट्रातील शासकिय यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर ये

सातारा जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम
इस्लामपूर येथे राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
देयके प्रमाणक नमुन्यासह देयकांवर नगराध्यक्षांच्या बेकायदेशीररीत्या स्वाक्षरी; विरोधी पक्षनेत्या दीपाली शेळके यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

कोल्हापूर / प्रतिनिधी : कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रूग्ण सापडल्यानंतर महाराष्ट्रातील शासकिय यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील दर्शनासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला. आता तासाला 1500 ऐवजी केवळ 1200 भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. याच बरोबर कोरोना संसर्ग वाढल्यास 700 भाविकांना दर्शनाचे पास दिले जातील, अशी माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली. तसेच मंदिरासमोर भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे पुन्हा खुली करण्यात आली होती. सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, सरकारने हे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, सध्या कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
आता प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेत चार ते पाच ठिकाणी सॅनिटायझर मारण्यात येऊन त्याचे तापमान तपासण्यात येत आहे. प्रत्येक भाविकाला मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही. हजारोंच्या संख्येने भाविक असूनही सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली आहे. सध्या दर दोन तासांनी मंदिराची स्वच्छता केली जाते. मंदिर प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

COMMENTS