Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ताडोबा सफारी प्रकल्पाची 12 कोटींची फसवणूक

तिकीट बुकिंग करणार्‍या एजन्सीवर गुन्हा दाखल

चंद्रपूर/प्रतिनिधी ः ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली राज्य सरकारची तब्बल 12 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची घटना समोर आल्यामुळे

धक्कादायक! आधी प्रेमविवाह मग घरी शौचालय नसल्यामुळे नवविवाहितेची आत्महत्या
शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला.
अपहरणप्रकरणी आमदार सुर्वेसह 15 जणांवर गुन्हा

चंद्रपूर/प्रतिनिधी ः ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली राज्य सरकारची तब्बल 12 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या संदर्भात रामनगर पोलिसांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही आरोपी शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सीने प्रकल्पाची तब्बल 12 कोटी 15 लाख रुपयांची फडवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या सफारी बुकिंग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला दरवर्षी हजारो पर्यटक भेटी देत असतात. यासाठी येथे बूकिंग करणे गरजेचे असते. हे बूकिंग चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन ही सफारी बूकिंग एजन्सी करत होती. मात्र, या एजन्सीने पैसे थकविल्याने जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याचे पगार उशिरा झाले होते. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. तब्बल 12 कोटी 15 लाख रुपयांची ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. प्रकल्पाला एजन्सीने तीन वर्षांत एकूण 22 कोटी 80 लाख 67 हजार देय रकमेपैकी फक्त 10 कोटी 65 लाख रुपयांचा भरणा केला. मात्र, उर्वरित 12 कोटी 15 लाख रुपये देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी हे पैसे दिले नाहीत. ही बाब प्रकल्पाला समजल्यावर एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या एजन्सीने पैसे थकविल्याने जिप्सी चालकांच्या जून आणि जुलै महिन्याचे पगार देण्यास उशीर झाला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात तब्बल 338 जिप्सी आहेत. या जिप्सी चालकांच्या पगाराची रक्कम तब्बल 3 ते 4 कोटीच्या घरात आहे.

COMMENTS