नाशिक- इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन (आयपीएसएफ) यांच्या मान्यतेने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएश (एमपीएसए) यांच्यातर्फे ११ व्या राष्ट्रीय प

नाशिक- इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन (आयपीएसएफ) यांच्या मान्यतेने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएश (एमपीएसए) यांच्यातर्फे ११ व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट वरीष्ठ वयोगटातील महिला व पुरूष स्पर्धेला सुरुवात झाली आहे. शनिवारी (दि.१२ ऑगस्ट) या स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन झाले. २८ राज्य, ८ केंद्रशासित प्रदेशातून सुमारे ९०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी माजी आमदार श्री. जयवंत जाधव, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. किशोर येवले, एआयएमएचे माजी अध्यक्ष हर्षद बेळे, इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे खजिनदार इरफार अजीज भुट्टा, संजम सिंग, हरीश मकवाणा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर लगेचच स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी, स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता आयपीएसएफचे खजिनदार इरफान अजीज भुट्टा, एमपीएसएचे अध्यक्ष श्री. सुरेद्र प्रताप सिंग, मुख्य सल्लागार अॅड. विशाल सिंग, खजिनदार मुकेश सोनवाणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणार्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला आहे. ११ व्या राष्ट्रीय स्पर्धेतून विजयी होणार्या प्रत्येक वजनगटातील १६ खेळाडूंची निवड गोव्यामध्ये होणार्या ३७ व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी केली जाणार आहे. या खेळामध्ये मागील ११ वर्ष महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे. त्यामुळे वर्चस्व कायम राखण्याची संधी या स्पर्धेतून उपलब्ध आहे.
या क्रीडा प्रकारांमध्ये होतेय स्पर्धा- पिंच्याक सिलॅट खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा क्रीडा प्रकार आहे. टेडिंग (फाईट), तुंगल (सिंगल काता), रेगु (ग्रुप काता), गंडा (डेमो फाईट), सोलो (इव्हेंट) अशा पाच प्रकारांमध्ये स्पर्धा पार पडते आहे.
COMMENTS