Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यावर परीक्षा केंद्रावर कोयत्याने हल्ला

पुणे : जिल्ह्यातील ओतूर येथे दहावीच्या परीक्षा केंद्रात घडलेल्या हल्ल्याच्या घटनेने शैक्षणिक वातावरणाबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. परीक्ष

अबब..! रवींद्र नाट्य मंदिराच्या फक्त नुतनीकरणावर 250 कोटींचा खर्च; इतका मोठा निधी कुठे आणि कसा खर्च केला, याचे उत्तर उपअभियंता अजय बापट देणार का?बापटांचा डीपीडीसीच्या 7 कोटींचे कामे विकण्याचा घाट का ?
उपअभियंता अजय बापट यांचा 250 कोटींचा घोटाळा; रवींद्र नाट्य मंदिराच्या कामांमध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्ट्राचार
एकत्रीकरणाच्या चर्चा इतिहास जमा म्हणणारे कुठे गेले?


पुणे : जिल्ह्यातील ओतूर येथे दहावीच्या परीक्षा केंद्रात घडलेल्या हल्ल्याच्या घटनेने शैक्षणिक वातावरणाबाबत गंभीर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ओतूर येथील एका शाळेत दहावीची परीक्षा सुरू असताना सोमवारी सकाळी एक अल्पवयीन मुलगा परीक्षा केंद्रात घुसला आणि परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत वार हातावर झेलल्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र तो जखमी झाला. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी आरोपीसह आणखी काही जणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर परीक्षा केंद्रात काही काळ गोंधळ उडाला. उपस्थित शिक्षक व कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी विद्यार्थ्यावर उपचार करण्यात आले आणि नंतर त्याने सहाय्यकाच्या मदतीने परीक्षा पूर्ण केली. संबंधित आरोपी हा अकरावीचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमी विद्यार्थ्याने यापूर्वीही आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे. मात्र शाळा प्रशासनाने या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. यासंदर्भात कोणतीही ठोस नोंद किंवा दृश्य पुरावा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना शाळा परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. परीक्षा केंद्रांसारख्या संवेदनशील ठिकाणी अधिक कडक सुरक्षा उपायांची गरज अधोरेखित होत असून, अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक आहे.

COMMENTS