Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावी-बारावी परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार

मुंबई : माध्यमिक (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) जुलै-ऑगस्ट 2024 परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य मा

लकडगंज परिसरात असलेल्या लाकडाचे कारखाने जळून खाक | LOK News 24
राज ठाकरेंचा पाठिंबा ‘मनसे’ का ?
जातनिहाय जनगणनेवर संघाचे घुमजाव !

मुंबई : माध्यमिक (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) जुलै-ऑगस्ट 2024 परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ुुु.ारहरहीीललेरीव.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे  यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून हॉल तिकीट प्राप्त करावेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना हॉलतिकीट/प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून मिळणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक/ प्राचार्यांचा शिक्का देणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.  हॉल तिकीटामध्ये विषय व माध्यम बदल, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरूस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी त्वरीत शाळेस/महाविद्यालयास कळवावे. प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळा संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची पुन्हा प्रिंट काढून दुय्यम प्रत (डुप्लीकेट) असा उल्लेख करून प्रवेशपत्र उपलब्ध करून देणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव शैलेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

COMMENTS