Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरात कारखान्यावर 101 व्यक्तींचे रक्तदान

संगमनेर : अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी,अधिकारी व कार्यकर्त्यांनी असे एकूण 101 जणांनी रक्तदान केले आहे. रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असल्याचे यावेळी मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह येथे अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर झाले. यावेळी 101 नागरिकांनी रक्तदान केले. याप्रसंगी मा.महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात,कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक नवनाथ आरगडे, विजय राहणे, मदन आंबरे,योगेश भालेराव,अरुण वाकचौरे, गुलाब देशमुख आदी उपस्थित होते.  थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्ताने संगमनेर तालुक्यात 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कारखाना कर्मचाऱ्यांच्या वतीने 101 जणांनी रक्तदान केले असून यामध्ये कारखाना सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के यांनी आतापर्यंत जीवनात 101 वेळा रक्तदान केल्याचा योगायोग झाला आहे. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोहन मस्के यांचा सत्कार केला.  याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, विज्ञानाने मोठी प्रगती केली. मात्र अद्याप रक्त निर्मिती करता आली नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघातांचे प्रमाण. विविध आजार यामुळे रक्ताची मोठी गरज भासत आहे. राज्यभरात कधी कधी रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत असून युवकांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. रक्तदानामुळे कुणाचे तरी प्राण वाचत असून जगातील हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.

Sangamner : शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणतात… मी कधी रेशनचे धान्य घेतलेले नाही…
संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन
महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

संगमनेर : अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी,अधिकारी व कार्यकर्त्यांनी असे एकूण 101 जणांनी रक्तदान केले आहे. रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असल्याचे यावेळी मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

 सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह येथे अर्पण रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर झाले. यावेळी 101 नागरिकांनी रक्तदान केले. याप्रसंगी मा.महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात,कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक नवनाथ आरगडे, विजय राहणे, मदन आंबरे,योगेश भालेराव,अरुण वाकचौरे, गुलाब देशमुख आदी उपस्थित होते.

 थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्ताने संगमनेर तालुक्यात 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कारखाना कर्मचाऱ्यांच्या वतीने 101 जणांनी रक्तदान केले असून यामध्ये कारखाना सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के यांनी आतापर्यंत जीवनात 101 वेळा रक्तदान केल्याचा योगायोग झाला आहे. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोहन मस्के यांचा सत्कार केला.

 याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, विज्ञानाने मोठी प्रगती केली. मात्र अद्याप रक्त निर्मिती करता आली नाही. दिवसेंदिवस वाढत चाललेले अपघातांचे प्रमाण. विविध आजार यामुळे रक्ताची मोठी गरज भासत आहे. राज्यभरात कधी कधी रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होत असून युवकांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. रक्तदानामुळे कुणाचे तरी प्राण वाचत असून जगातील हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.

COMMENTS