मुंबई ः राज्यातील ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्क्यांऐवजी आता 100 टक्के शिक्षण शुल्
मुंबई ः राज्यातील ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 50 टक्क्यांऐवजी आता 100 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीला राज्य सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत हा निर्णय शिक्षण आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी यामध्ये राज्य सरकारने नुकतंच मुलींच्या मोफक शिक्षणाची घोषणा केली आहे. उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थीनींची संख्या वाढावी, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ व्यावसायिक शिक्षण घेणार्या मुलींसाठीच घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्य पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी आठवा होता. यावेळी अधिवेशनाच्या पूर्वी विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ’सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई’, सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. भाजी महागली, कडधान्य महागले, खत बियाणे महागले, महागाईने मध्यमवर्गीय कोलमडले, सरकारने लुटली सरकारी तिजोरी जनतेच्या हाती दिली महागाईची शिदोरी, सामान्य माणूस कमवतो पाई पाई, त्याला लुटून खाते महायुतीच्या काळातील महागाई अशा घोषणा देत विरोधक आक्रमक झाले होते.
COMMENTS