Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील गुंतवणूकदारांना 100 कोटींचा गंडा

ईडीची पॉन्झी स्कीमवर कारवाई पाचही आरोपी परदेशात फरार

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यामध्ये सर्वाधिक ऑनलाईन फसवणूक होण्याचे गुन्हे घडत असतांना, बनावट कंपनी स्थापन करून त्यात गुंतवणूकीचे आमिष दाखवून अनेकांना ल

बाजारतळातील शेड कोसळुन एक जण जखमी.
कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी पाटगाव धरण मध्यरात्री ओहरफ्लो
डायल 112 चा गैरवापरप्रकरणी गुन्हा दाखल

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यामध्ये सर्वाधिक ऑनलाईन फसवणूक होण्याचे गुन्हे घडत असतांना, बनावट कंपनी स्थापन करून त्यात गुंतवणूकीचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रूपयांचा गंडा घालणार्‍यांचे पेव फुटले आहे. पुण्यात खोटी कंपनी स्थापन करून त्यात गुंतवणूक केल्यास तब्बल दरमहा 2 ते 3 टक्क्यांनी परतावा देण्याच्या बहाण्याने पॉन्जी स्कीम चालवून राज्यातील विविध गुंतवणूकदारांची तब्बल 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पुण्यातील आंबेगाव परिसरामध्ये छापमारी केली आहे. आहे. याप्रकरणी ईडीच्या अधिकार्‍यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुंतवणूकदारांनी  दरमहा 2 ते 3 टक्क्यांनी परतावा गुंतवणूकदारांना देण्याच्या बहाण्याने पॉन्जी स्कीम चालवून राज्यातील विविध गुंतवणूकदारांची सुमारे 100 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पाचही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. विनोद तुकराम खुंटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडधे व त्यांचे अन्य साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हे आरोपी फरार असून त्यांना अटक अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी ईडीच्या अधिकार्‍यांनी तक्रार दिली आहे. फसवणुकीचा हा फरार 2020 पासून सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आयपीएस ग्रुप ऑफ कंपनी व ग्लोबल अ‍ॅफिलेट बिजनेस ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना प्रतिमाह 2 ते 3 टक्के व्याज दराने परतावा देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी पॉन्जी स्किम राज्यभरातील अनेकांकडून मोठी रक्कम गोळा केली. ही रक्कम थेट लोकांकडून घेत कंपनीच्या बँक खात्यामध्ये थेट न घेता विविध बँकेत बोगस बँक खाते बनवुन त्यांचे या खात्यांमध्ये पैसे घेतले. कमिशनचे आमिष दाखवून आणखी काही नागरिकांना त्यांनी यात गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे.

COMMENTS