Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूत विषारी दारूचे 10 बळी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तामिळनाडू राज्य विषारी दारूमुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यामुळे हादरले असून, बनावट दारू विकल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्या

लोकसभा अध्यक्ष निवड आणि सद्यस्थिती !
आदिवासींचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
जमात-ए-इस्लामी हिंद बीडच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना निवेदन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तामिळनाडू राज्य विषारी दारूमुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यामुळे हादरले असून, बनावट दारू विकल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या विल्लुपरम आणि चेंगलपट्टू या दोन जिल्ह्यांत ही घटना घडली आहे. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तर, 33 हून अधिक लोकांवर उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या दोन जिल्ह्यांत एकाचवेळी 10 जणांचा मृत्यू झाले असल्याने पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील घटनेचा परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत असून याप्रकरणी बनावट दारू विकल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विल्लपुरम जिल्ह्यातील मरमक्कम येथील एकियारकुप्पम येथे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित चार मृत्यू चेंगलपट्टू येथील चिथामूर येथे मृत्यू झाले आहेत. इथेनॉल आणि मिथेलॉन मिश्रित बनावट मद्य प्राशन केल्याने हे मृत्यू झाले असल्याची प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. विल्लपुरम जिल्ह्यातील सहा जणांना काल (14 मे) उलट्या, डोळ्यांत जळजळ आणि चक्कर येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारांदरम्यान चौघांचा मृत्यू झाला. तर, दोघांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. परंतु, कालांतराने या दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच, 33 लोकांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचेही सांगण्यात आले आहे. याप्रकरणात अमरान याला अटक करण्यात आली आहे.

COMMENTS