Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशातील अपघातात 10 जणांचा मृत्यू

लखनऊ ः देशभरात सोमवारी रक्षाबंधनाचा सणासाठी अनेक जण गावी जातांना दिसून येत असतांना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे रविवारी बस आणि पिकअपच्या धडकेत

जिल्ह्यात चार महिन्यात 129 अपघातात 139 जणांचा मृत्यू
भर रस्त्यात डंपर चालकानं गाडीवरील तरुणीला चिरडलं
दुर्देवी ! लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात .

लखनऊ ः देशभरात सोमवारी रक्षाबंधनाचा सणासाठी अनेक जण गावी जातांना दिसून येत असतांना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे रविवारी बस आणि पिकअपच्या धडकेत 10 जण ठार झाले असून, 27 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी शिकारपूर-बुलंदशहर मार्गावर रास्ता रोको केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
हा अपघात एवढा भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. सेलमपूर परिसरात बस आणि पिकअपची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच प्रवाशांच्या उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सर्व मृत अलिगड जिल्ह्यातील अत्रौली तालुक्यातील रायपूर खास अहिर नागला या गावातील रहिवासी होते. अलिगड जिल्ह्यातील अत्रौली तहसीलमधील रायपूर खास अहिर नागला गावातील 40 हून अधिक लोक गाझियाबादहून अलीगढला जात होते. हे लोक गाझियाबादच्या बुलंदशहर रोड बी-10 येथे असलेल्या एका खासगी कंपनीत काम करायचे. रविवारी सकाळी गाझियाबादहून पिकअपमधून सर्वजण आपल्या घरी निघाले होते. सलेमपूर पोलीस ठाणे हद्दीत समोरून येणार्‍या खासगी बसने पिकअपला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 27 जणांवर उपचार सुरु आहेत. सोमवारी रक्षाबंधन असल्याचे सर्वजण आपल्या गावी जाताना दुर्घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

COMMENTS