थोरात यांच्या पाठपुराव्यातून मेंगाळ कुटुंबीयांना 10 लाखाची मदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरात यांच्या पाठपुराव्यातून मेंगाळ कुटुंबीयांना 10 लाखाची मदत

संगमनेर/प्रतिनिधी : मेंगाळवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मिराबाई रामभाऊ मेंगाळ या आदिवासी महिलेच्या कुटुंबाला काँग्रेस विधिमंडळ पक्

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आमदार रोहित पवारांचे कौतुक… म्हणाले, भगवा ध्वज सामर्थ्य, बलिदानाचे प्रतीक
घोटाळेबाज पुन्हा नगर अर्बनमध्ये येण्याच्या तयारीत ?; बँक बचावच्या गांधींनी दिले खुल्या चर्चेचे आव्हान
वरखेड यात्रा नियोजनासाठी उद्या नगरला होणार बैठक

संगमनेर/प्रतिनिधी : मेंगाळवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मिराबाई रामभाऊ मेंगाळ या आदिवासी महिलेच्या कुटुंबाला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून शासनाकडून 10 लाख रूपयांची मदत मिळाली आहे. मेंगाळवाडी येथे डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते मेंगाळ कुटुंब यांना त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेल्या दहा लाख रुपयांचे पासबुक देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे, राजहंस दुध संघाचे संचालक विलास कवडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. मेंगाळवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात मिराबाई रामभाऊ मेंगाळ ह्या मृत पावल्या. यानंतर तातडीने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून मेंगाळ कुटुंबीयांना मदत करण्यात आली. तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः जाऊन मेंगाळ कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शासनाकडून सर्व योजनांमधून तातडीने या कुटुंबाला मदत मिळावी याकरता प्रशासनाला सूचना केल्या. यानुसार प्रशासनाच्या वतीने मेंगाळ कुटुंबीयांना दहा लाख रुपयांच्या धनादेश त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील वाडी वस्तीवरील नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने योजना राबविले आहेत. एक तालुका एक परिवार ही योजना तालुक्यात राबवली जात असून आमदार थोरात यांनी मेंगाळ कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळून दिली आहे. मिलिंद कानवडे म्हणाले की आमदार थोरात यांनी सातत्याने गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभाग घेतला आहे आमदार थोरात यांच्यामुळे या कुटुंबीयांना मोठी भरीव मदत झाली असल्याचे ते म्हणाले

COMMENTS