हरिद्वारहून परतणार्‍या वाहनाला अपघात, 10 ठार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हरिद्वारहून परतणार्‍या वाहनाला अपघात, 10 ठार

लखनौ : उत्तर प्रदेशामधील पिलीभीत जिल्ह्यात हरिद्वारहून स्नान करून परतणार्‍या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जख

बीड – सोलापूर रेल्वे मार्गाचा केंद्र सरकारने विचार करावा
शिवप्रेमी प्रेक्षकांनी अनुभवला शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातील थरार
सुपे परिसरातील अतिक्रमण जैसे थे

लखनौ : उत्तर प्रदेशामधील पिलीभीत जिल्ह्यात हरिद्वारहून स्नान करून परतणार्‍या भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग 730 वर गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते झाडावर आदळले. ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले. ही घटना गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालामूरमध्ये घडली आहे. हरिद्वारहून स्नान करून परतणार्‍या 17 भाविकांनी भरलेली चारचाकी परतत होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जेथे अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

COMMENTS