Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गव्हाच्या शेतातून 1 हजार 374 अफूची झाडे जप्त

पुणे : हवेली तालुक्यातील होळकरवाडी भागात गव्हाच्या शेतामध्ये अफूची लागवड केल्याचा प्रकार लोणीकाळभोर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला असून, तब्बल 1

केदारनाथ धाम मध्ये हिमस्खलनाचे भीषण दृश्य
कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधात सीबीआय, ईडीकडे तक्रार
एलॉन मस्क पहिल्यांदाच भारत दौर्‍यावर

पुणे : हवेली तालुक्यातील होळकरवाडी भागात गव्हाच्या शेतामध्ये अफूची लागवड केल्याचा प्रकार लोणीकाळभोर पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला असून, तब्बल 1 हजार 374 झाडे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या झाडांची किंमत 11 लाख 60 हजार एवढी आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

राजाराम दामोदर होळकर (वय 50, रा. होळकरवाडी, ता. हवेली), बाळू किसन कटके (वय 50) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात गांजा, मॅफेड्रोन या अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. लोणीकाळभोर पोलिसांचे पथक होळकरवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी होळकरवाडीकडे जाणार्‍या ओढ्याच्या परिसरात चिमणी तलावाच्या शेजारी गव्हाच्या शेतात अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने होळकर आणि कटके यांना पकडले. पोलिसांनी तेथे कारवाई केली. 11 लाख 60 हजार रुपये किंमतीची 116 किलोग्रॅम अफू जप्त करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, उपनिरीक्षक अमोल घोडके, साळुंके, कुदळे, नानापुरे आदींनी ही कारवाई केली.

COMMENTS