Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र बँकेत 1 कोटी 73 लाखांचा अपहार

पुणे ः महाराष्ट्र बँकेच्या दौंड तालुक्यातील गोपाळवाडी शाखेत कंत्राटी मदतनीसाने अपहार केला आहे. कंत्राटी मदतनीसाने ठेवीदार आणि खातेदारांच्या खात्य

सावेडीतील बहुचर्चित रस्ता अखेर गुंडाळला ; अर्धवट अवस्थेतील काम मनपाने केले रद्द, शासनाला पैसेही परत पाठवले
३५ वर्षांनी रिक्रिएट झाले अशोक सराफ-किशोरी शहाणेंचं ‘तुझी माझी जोडी जमली’ गाणं
उद्धवांच्या मदतीला धावले राज!

पुणे ः महाराष्ट्र बँकेच्या दौंड तालुक्यातील गोपाळवाडी शाखेत कंत्राटी मदतनीसाने अपहार केला आहे. कंत्राटी मदतनीसाने ठेवीदार आणि खातेदारांच्या खात्यांमधून एकूण 1 कोटी 73 लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँक अधिकार्‍यांच्या कॉम्प्युटरचा पासवर्ड वापरून बनावट मुदत ठेव प्रमाणपत्र, पावत्या आणि दस्ताऐवज तयार करून अपहार केल्याचा धक्कादायक केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम तुकाराम भागवत असे कंत्राटी मदतनीसाचे नाव समोर आले आहे. 2018 ते 20 जुलै 2023 या कालावधीत परशुराम भागवतने अपहार केल्याचे समोर आले आहे.  

COMMENTS