इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील एम. डी. पवार पीपल्स को-ऑप बँकेस आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटी 53 लाख इतका ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे मार्गद

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील एम. डी. पवार पीपल्स को-ऑप बँकेस आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटी 53 लाख इतका ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे मार्गदर्शक संचालक वैभवराव पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, बँकेच्या ठेवी 69.15 कोटी व एकूण कर्जे 38.16 कोटी दिली आहेत. गुंतवणूक 32.16 कोटी व बँकेचा नेट एनपीए 4.32 इतका आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय हा 2 कोटी 90 लाख इतका आहे. तसेच बँकेचा एकूण व्यवसाय 107.31 कोटी तर सीआरऐआर 20.78 टक्के इतका आहे. बँकेची सांपत्तीक स्थिती समाधानकारक आहे. इस्लामपूर, सांगली, मिरज, कोल्हापूर अशा शाखा असून सर्व शाखा संगणीकृत व अद्यावत असून कोअर बँकींग प्रणालीशी जोडलेल्या आहेत. बँकेचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष नगरभूषण स्व. एम. डी. पवार यांनी दुरदृष्टी ठेवून स्थापन केलेल्या बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांसह समाजातील सर्व स्तरांतील जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटीबध्द असल्याचे, बँकेचे मार्गदर्शक संचालक वैभव पवार यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, तज्ञ संचालक सुहास हावळे, चंद्रकांत खंकाळे, सुभाष देसाई, भिमराव गायकवाड, जालिंदर पाटील, जयवंत खंडागळे, जयकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय खांबे, ज्यु. ऑफिसर महेश गायकवाड उपस्थित होते.
COMMENTS