Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिकाची 1 कोटी 21 लाखांची फसवणूक

पुणे : ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची विक्री करणार्‍या एका प्रसिद्ध कंपनीचा वितरक असल्याच्या बतावणीने व्यावसायिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमीष दाखवून तरुणीची फसवणूक
राहुरीतील व्यापार्‍याला 23 लाख रूपयांना घातला गंडा
भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून 35 हजारांची फसवणूक

पुणे : ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची विक्री करणार्‍या एका प्रसिद्ध कंपनीचा वितरक असल्याच्या बतावणीने व्यावसायिकाची एक कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाइन उत्पादन विक्री करणार्‍या कंपनीकडून स्वस्तात उत्पादने मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चैतन्य उर्फ अंकित भाऊसाहेब पाटील (वय 34, रा. कळंबी, ता. मिरज, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाची आरोपी पाटीलशी ओळख झाली होती. गृहोपयोगी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह दैनंदिन वापरातील विविध वस्तूंची कंपनीकडून स्वस्तात विक्री करण्यात येणार असल्याचे पाटीलने व्यावसायिकाला सांगितले. सांगली जिल्ह्यातील अनेकांना स्वस्तात दुचाकी, मोबाईल संच, दूरचित्रवाणी संच, फ्रिज, सोन्याची बिस्कीटे, टायर अशा अनेक वस्तू स्वस्तात मिळवून दिल्याचे पाटीलने त्यांना सांगितले होते. व्यावसायिकाला सुरुवातीला आरोपीने स्वस्तात लॅपटॉप, मोबाईल संच दिले. त्यांना एका सराफी पेढीतील दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने पाटीलने दिले. पाटीलने व्यावसायिकाला कमी किंमतीत 18 लाख रुपयांच्या वस्तू दिल्या होत्या. व्यावसायिकाला जाळ्यात ओढून पाटीलने वेळोवेळी एक कोटी 21 लाख रुपये उकळले. मोठी रक्कम मिळाल्यानंतर पाटीलने त्यांना वस्तू उपलब्ध करून दिल्या नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.

COMMENTS