Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यटन विकास योजनेतून टेबल लॅन्ड पठारावरील वाहनतळासाठी 1 कोटी 13 लाखाचा निधी : आ. पाटील

पाचगणी / वार्ताहर : टेबल लॅन्ड पठारावर वाहनतळ विकसित करणेसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 1 कोटी 13 लाखाचा निधी उपलब्ध झाला असून या माध्यमा

वाळवा तालुका गुलामगिरीतून मुक्त करा : निशिकांत पाटील
परिवर्तनामध्ये आमच्या महिला आघाडीवर असतील : स्नेहल नायकवडी
मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर शेलारांचा गंभीर आरोप

पाचगणी / वार्ताहर : टेबल लॅन्ड पठारावर वाहनतळ विकसित करणेसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 1 कोटी 13 लाखाचा निधी उपलब्ध झाला असून या माध्यमातून नगरपालिका पर्यटकांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करू शकेल, असा विश्‍वास आ. मकरंद आबा पाटील यांनी व्यक्त केला.
पर्यटन नगरी पाचगणी येथील टेबल लॅन्ड पठारावर प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2023-24 मधून वाहनतळ विकसित करणे कामाचा भूमिपूजन समारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत वाई-खंडाळा- महाबळेश्‍वर मतदार संघाचे आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आ. पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे,पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, नानासाहेब कासुर्डे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामणे, माजी नगरसेवक प्रवीण बोधे, गँब्रियल फर्नांडिस, शरद कासूर्डे, समाजसेवक प्रकाश गोळे, जावली बँकेचे संचालक अजित कळंबे, महाबळेश्‍वरचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पारटे, टेबल लॅन्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे, दिलिप कांबळे, हेन्री जोसेफ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बगाडे, मिथुन नायकवडी, पाचगणी पोलीस ठाण्याचे सपोनि राजेश माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी माहिती देताना आपण शहरातील पर्यटन स्थळांच्या विकासाच्या माध्यमातून या वाहन तळाच्या निर्मितीनंतर सुमारे 115 वाहनांची सोय होणार आहे. तर तलावाच्या सुशिभोकरणाचा कामाची माहिती यावेळी दिली.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पठारावरील तलावाच्या विकास कामाचा आढावा घेतला. घोडे व घोडागाडी व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पहिल्यांदा ही सर्व कामे होऊ द्यात त्यानंतर तुमच्या घोडे ट्रॅक बाबत आपण सकारात्मकपणे प्राधान्याने विचार करू असे सांगितले.
यावेळी कोनशिलेचे उद्घाटन व श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच टेबल लॅन्ड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकार्‍यांनी आ. पाटील व जिल्हाधिकारी याचा पुषापगुच्छ व शाल देवून सत्कार केला.

COMMENTS