डॉ. बाबासाहेब आणि रमाबाई यांच्या एकत्र पुतळ्याने शहराच्या वैभवात वाढ – पालकमंत्री भरणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आणि रमाबाई यांच्या एकत्र पुतळ्याने शहराच्या वैभवात वाढ – पालकमंत्री भरणे

सोलापूर : शहरातील विकास कामे जातपात, पक्ष यांचा विचार न करता करावीत. विकासाची कामे करताना कोणताही वाद होता कामा नये. गरिबांच्या हिताचे काम करा. भारतर

शंखी गोगलगायीमुळे नुकसानीची भरपाई देणार, समिती स्थापणार : मंत्री अब्दुल सत्तार
मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
गुजरात निकालाचा अन्वयार्थ

सोलापूर : शहरातील विकास कामे जातपात, पक्ष यांचा विचार न करता करावीत. विकासाची कामे करताना कोणताही वाद होता कामा नये. गरिबांच्या हिताचे काम करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर यांचा न्यु बुधवार पेठ येथील उद्यानामध्ये एकत्र पुतळा उभारण्याचे काम होणार आहे. असा पुतळा राज्यातील एकमेव असून यामुळे शहराच्या वैभवात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सोलापूर शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी श्री. भरणे बोलत होते. यावेळी विविध ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, नगरसेवक सर्वश्री चेतन नरोटे, महेश कोठे, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, तौफिक शेख, तौफिक हत्तुरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. भरणे यांनी सांगितले की, नागरिक दलितेतर योजनेंतर्गत प्रत्येक कामाला निधी उपलब्ध करून दिला आहे. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून सर्व काही करणार आहे. शहरातील नागरिकांना 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. सामान्य जनतेसाठी आपल्या खुर्चीचा उपयोग व्हावा, प्रत्येकांनी कर्तव्य म्हणून काम करावे. लोकहिताच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही श्री. भरणे यांनी दिली. पार्क चौकातील नॉर्थ कोट मैदान सुशोभिकरण उद्घाटन, मुस्लिम पाच्छा पेठ, किडवाई चौक, जिंदाशा मदार चौक ते पद्मशाली चौक रस्ता काँक्रिटीकरण शुभारंभ, प्रभाग क्रमांक 5 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणा भूमी सुशोभिकरण शुभारंभ, थोरला मंगळवेढा तालिम संघाचे उदघाटन, प्रभाग क्रमांक चारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उदघाटन आणि नवीन बुधवार पेठ येथील उद्यानामध्ये माता रमाई आंबेडकर पुर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरणाचा शुभारंभ श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणा भूमी येथे पाहणी करून माहिती घेतली

COMMENTS