हॉटेल चालकांचा  प्रामाणिकपणा, हॉटेलमध्ये विसरलेले ५ तोळे सोन्यासह २० हजाराची रोख रक्कम केली परत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉटेल चालकांचा प्रामाणिकपणा, हॉटेलमध्ये विसरलेले ५ तोळे सोन्यासह २० हजाराची रोख रक्कम केली परत

नेवासा ( तालुका प्रतिनिधी )  कोरोना महामारीमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अशा परिस्थिती हॉटेल व्येवसाईक

नेवासा येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
विविधरंगी गणेशमूर्तींनी सजल्या नेवासा येथील बाजारपेठा
दिगंबरा..दिगंबरा श्रीपाद वल्लभ..दिगंबरा..चा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी करत देवगड दत्त मंदिर भाविकांसाठी खुले

नेवासा ( तालुका प्रतिनिधी ) 

कोरोना महामारीमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अशा परिस्थिती हॉटेल व्येवसाईक पूर्ण पणे डबखाईला आला असल्याने हॉटेल चालक यांच्या कमाईत घट झाली आहे. तरीदेखील अशा महामारीच्या परिस्थितीत प्रामाणिकपणा हरवलेला नाही.  नगर औरंगाबाद महामार्गावरील हंडीनिमगावं येथील हॉटेल धनश्री चें मालक दिलीप पाटिल वाघ हे त्याचेच एक उदाहरण आहे.

वाघ यांच्या हॉटेल मध्ये दि २४ रोजी शुक्रवारी दुपार च्या सुमारास एका बॅगेत नेकलेस, झुंबर, शॉट गंठण, गळ्यातील हार, अंगठी, मोबाईल, व वीस हजार रोख रक्कम आणि ओळखपत्र असे तब्बल ५ तोळे सोने व रोख रक्कम २० हजार एका बॅगेत मिळून आली

सदरील बॅग जिल्हा बुलढाणा तालुका सिंदखेडराजा गावं शिवनी येथील रहिवाशी बबन पंढरीनाथ राठोड पत्नी ज्योती बबन राठोड हे पुणे येथे नोकरी निमित्त जातं असतांना जेवण करण्यासाठी नगर औरंगाबाद हायवेवर असलेल्या हॉटेल धनश्री येथे थांबले असता

नजर चुकीने त्यांची बॅग हॉटेल मध्ये राहिली मात्र हॉटेल मालक दिलीप पाटील वाघ यांच्या सुदैवाने प्रवाशांची बॅग व पैसे विसरल्याचं लक्षात आल्या नंतर त्यांनी नेवासा पोलीस स्टेशनला याबाबत संपर्क करुन बॅगबाबत माहिती देत असताना मात्र प्रवासी जोडप्याचा  बॅगेतील मोबाईल व ओळखपत्रा च्या माध्यमातून संपर्क केला असता सदरील जोडपे प्रवासातुन परत आले व सोनं व पैसे असलेली बॅग ताब्यात घेतली सदरील प्रकारा बाबत हॉटेल मालक वाघ यांचे नागरिकांन मधून कौतुक केलं जात आहे

खूप कष्टाने पैसे जमा करून पत्नी साठी व गुंतवणूक म्हणून सोनं केलं होतं आज हॉटेल मालक दिलीप पाटील वाघ यांचा प्रामाणिक पणा पाहून जगात देव माणसांची कमी नसल्याची जाणीव झाली.

बबन राठोड– प्रवाशी

हॉटेल मध्ये येणारी प्रत्येक वेक्ती आम्हाला देवा रुपी आहे माणुसकीच्या नात्याने आपण देखील कुठंतरी समाजाचं  देणं लागतो मी देखील सामान्य कुटूंबातील आहे गरिबीची जाणीव असल्याने आज बॅग परत करून मोठे समाधान वाटले आहे. 

दिलीप पाटील वाघ — हॉटेल मालक

COMMENTS