हाता-पायाला मुंग्या येताहेत… दुर्लक्ष करू नका, नाहीतर…

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

हाता-पायाला मुंग्या येताहेत… दुर्लक्ष करू नका, नाहीतर…

वेब टीम : मुंबई तुमच्याही हाता-पायात काहीवेळा ‍मुंग्या येतात ना? तुम्ही कधी त्यावर उपचार केलेत का? तुम्ही म्हणाल यावर काय उपचार करायचे,  ह

दूध उत्पादनाचा खर्च कमी राखण्यात व शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यात होते मदत  
आरक्षणाचा तिढा आणि उपाय
राहुरी-ताहराबाद रस्त्याचे काम अखेर सुरू

वेब टीम : मुंबई

तुमच्याही हाता-पायात काहीवेळा ‍मुंग्या येतात ना? तुम्ही कधी त्यावर उपचार केलेत का? तुम्ही म्हणाल यावर काय उपचार करायचे, 

हे तर सर्वसामान्य आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का या समस्येवर वेळीच उपचार करणं फार गरजेचंं आहे.


एकाच जागेवर बराच वेळ बसल्याने किंवा हातापायाच्या एखाद्या शिरेवर दाब आल्याने हातपाय सुन्न होतात. त्यालाच मुंग्या येणे म्हणतात. 

प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना हा त्रास जाणवतो. एकदा किंवा दोनदा अशा मुंग्या येणे सर्वसाधारण आहे. पण सतत असे घडतं राहिल्यास वेळीच यावर उपचार व्हायला हवे.

मधुमेही रुग्णांमध्ये हाता-पायाला मुंग्या येण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. शरीरात जर व्हिटॅमिन ‘बी’ची कमतरता असेल, तर अशा मुंग्या येतात.

यामुळे अनेकदा मुंग्या आलेला अवयव सुन्न पडतो. अनेकदा केमोथेरेपी सुरू असणाऱ्या रुग्णांनाही अशा समस्या जाणवतात. त्यावर वेळीच निदान आणि उपचार केल्यास ही समस्या दूर करता येऊ शकते.”

मुंग्या येण्याची प्रमुख कारणे-

बराच वेळ एकाच ठिकाणी बसल्याने ही समस्या उद्भवते.

शरीरात व्हिटॅमिन ‘बी’ ची कमतरता असल्यास हा त्रास होऊ शकतो.

सातत्याने संगणकावर टायपिंग केल्याने मनगटाच्या नसा आकुंचित पावतात आणि हाताला मुंग्या येतात.

मानेची नस आखडली गेल्यास पाठीपासून पायापर्यंत आणि मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात.

हायपरथायरॉइडझम असलेल्यांना हा त्रास जाणवू शकतो.

उपाय

अंगावर मुंग्या येत असल्यास शक्यतो घरगुती उपाय करू नये.

ही समस्या अधिक प्रमाणात जाणवत असेल तर तातडीने न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका.

एखाद्या औषधांचे सेवनामुळे मुंग्या येत असल्यास तातडीने डॉक्टरांनकडून औषधं बदलून घ्या.

COMMENTS