हनीट्रॅप ब्लॅकमेलिंग जाळ्यात अडकला क्लासवन अधिकारी ; नगर तालुका पोलिसात दुसरा गुन्हा दाखल, 3 कोटीची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हनीट्रॅप ब्लॅकमेलिंग जाळ्यात अडकला क्लासवन अधिकारी ; नगर तालुका पोलिसात दुसरा गुन्हा दाखल, 3 कोटीची मागणी

नगर तालुक्यातील जखणगाव येथे दोन-तीन दिवसांपूर्वी उघड झालेल्या हनीट्रॅप ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराला नगरमध्ये काम करणारा एक क्लासवन अधिकारीही बळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

गौतम पब्लिक स्कूल क्रिकेटमध्ये अजिंक्य
माथाडी कामगारांसाठी विविध उपक्रम राबवावेत – संभाजी कदम
श्रीगोंद्यात 832 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर तालुक्यातील जखणगाव येथे दोन-तीन दिवसांपूर्वी उघड झालेल्या हनीट्रॅप ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराला नगरमध्ये काम करणारा एक क्लासवन अधिकारीही बळी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. या अधिकार्‍यास महिलेसमवेत शरीरसंबंधांचे आमीष दाखवून व करण्यास भाग पाडून त्याचा अश्‍लिल व्हीडीओ बनवला गेला व त्याआधारे धमकी देऊन 3 कोटींची मागणी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगर तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

नगर तालुक्यातील जखणगाव येथे एका व्यावसायिकाला असे ब्लॅकमेलिंग करून त्याच्याकडे 1 कोटीची खंडणी मागण्याचा प्रकार या व्यावसायिकाने धाडसाने पोलिसांकडे धाव घेतल्यावर उघड झाला आहे व त्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आता या महिलेसह तिच्या अन्य साथीदारांवर असाच दुसरा गुन्हाही दाखल झाला आहे. एका शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने याबाबत तक्रार दिली असून, त्यावरून दि. 18 रोजी नगर तालुका पोलिसांनी भादवि कलम 394,397,385, 120(ब) 34 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा 1 मे रोजी घडला. या गुन्ह्यातील आरोपींनी संगनमत करुन शरीरसंबंधांचे आमिष दाखवून तसेच त्यांच्यातील महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचा अश्‍लील व्हीडीओ बनवला होता. त्यानंतर, आम्हास 3 कोटी रुपये आणून दे. नाहीतर हा अश्‍लील व्हीडीओ पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी या गुन्ह्यातील आरोपींनी त्या अधिकार्‍याला दिली होती. यावेळी फिर्यादीच्या (अधिकारी) गाडीच्या डिक्कीत असणारे 30 हजार रुपये रोख व ऑनलाईन 50 हजार रुपये आरोपींच्या नातेवाईकाच्या खात्यावर बळजबरीने वर्ग करुन घेतले.

तीनजण केले अटक

नगर तालुका पोलिसात हनीट्रॅप ब्लॅकमेलिंग प्रकरणी दाखल झालेल्या दुसर्‍या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तातडीने सुरू केला व पोलिस पथकासह हमीदपूर येथे राहणारा आरोपी सचिन खेसे याला ताब्यात घेऊन व त्याला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता हा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार महिला व तिचे साथीदार अमोल सुरेश मोरे (रा. कायनेटीक चौक, अहमदनगर) महेश बागले (रा. नालेगाव) व सागर खरमाळे (रा.नालेगाव) यांना सोबत घेऊन केल्याची कबुली दिली. या आरोपींनी फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून बांधून मारहाण करुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती व एकुण 80 हजार रुपये जबरदस्तीने लुबाडले होते. यापैकी तीन आरोपी अटक असून सागर खरमाळे व महेश बागले यांचा शोध सुरु आहे. या आरोपींनी आणखी कोणास या पद्धतीने आमीष दाखवून लुबाडले आहे काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

भीती न बाळगता माहिती द्या

नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा प्रकारे शरीरसंबंधांचे आमिष दाखवून व त्याचे अश्‍लील व्हीडीओ बनवून आणि ते पोलिसात देण्याची धमकी देऊन लूट केल्याची वा पैशांची मागणी केली असल्यास तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

COMMENTS